Matthew Perry : जॉर्ज क्लूनीचा दावा, ‘फ्रेंड्स’च्या शूटिंगवेळी खुश नव्हते मॅथ्यू पेरी | पुढारी

Matthew Perry : जॉर्ज क्लूनीचा दावा, 'फ्रेंड्स'च्या शूटिंगवेळी खुश नव्हते मॅथ्यू पेरी

लोकप्रिय शो ‘फ्रेंड्स’ मध्ये चँडलरची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवणारे मॅथ्यू पेरी यांच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला होता. ते केवळ ५४ वर्षांचे होते. नुकताच त्यांनी ॲटॉप्सी रिपोर्ट समोर आला होता. ज्यामध्ये त्यांच्या मृत्यूच्या कारण समोर आले होते. एनेस्थेटिक केटामाईनच्या तीव्र प्रभावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. (Matthew Perry ) अभिनेते-चित्रपट निर्माते जॉर्ज क्लूनीने दावा केला आहे की, मॅथ्यू ड्रग्स आणि दारुच्या व्यसनामुळे ‘फ्रेंड्स’च्या शूटिंगवेळी खुश नव्हते. (Matthew Perry )

संबंधित बातम्या –

जॉर्ज क्लूनीने इंग्रजी मीडियाला सांगितले की, मॅथ्यू पेरींना नेहमीच सिटकॉममध्ये भूमिका साकारायची होती. ‘फ्रेंड्स’मध्ये प्रसिद्ध पात्र चँडलर बिंगची भूमिका साकारल्यानंतर त्यांचे स्वप्न सत्यात उतरले होते. आपल्या व्यसनामुळे तो आनंदी राहत नसत.

६२ वर्षांचे जॉर्ज क्लूनी म्हणाला, ‘ते एका मुलासारखे होते. ते मला आणि रिचर्ड काईंड आणि ग्रांट हेस्लोवशी हेच म्हणायचे की’मला फक्त एका सिटकॉमवर येऊ इच्छितो, यार. मी फक्त एक रेग्युलर सिटकॉमवर येऊ इच्छितो आणि मी धरतीवर सर्वात आनंदी व्यक्ती बनेन. ते आनंदी नव्हते.’

जॉर्ज क्लूनी म्हणाला, ‘आम्हाला इतकचं माहिती होतं की, ते आनंदित नव्हते. आणि मला माहिती नव्हते की, ते काय करत होते. एका दिवसात १२ विकोडिन आणि त्या सर्व गोष्टी ज्याच्याबद्दल तो आमच्याशी बोलत होते. त्या सर्व गोष्टी मन दुखावणारी होती.

जॉर्ज पहिल्यांदा वयाच्या १६ व्या वर्षी मॅथ्यूला भेटले होते. अभिनेता मॅथ्यू पेरी यांचे २८ ऑक्टोबर रोजी वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले होते. लॉस एंजेलिस परिसरातील त्यांच्या निवासस्थानी ते मृतावस्थेत आढळले होते, असे रॉयटर्सने वृत्त दिले होते.

Back to top button