Shreyas Talpade : श्रेयस तळपदेसाठी चाहत्यांची प्रार्थना, नेटकऱ्यांनी अशा केल्या कॉमेंट्स

Shreyas Talpade
Shreyas Talpade

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी आणि बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेला काल हार्ट ॲटॅक आला होता. तो अक्षय कुमारसोबत वेलकम ३ चे शूटिंग संपवून घरी परतला होता. जेव्हा त्यची तब्येत बिघडली तेव्हा त्याच्या फॅन्सना मोठा धक्का बसला. (Shreyas Talpade) सोशल मीडियावर फॅन्स त्याच्या तब्येतीसाठी कॉमेंट्स करत आहेत. तो लवकरात लवकर बरा व्हावा, यासाठी फॅन्स प्रार्थना करत आहेत. (Shreyas Talpade)

संबंधित बातम्या –

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, श्रेयसची तब्येत बिघडल्यानंतर पत्नीने त्याला रुग्णालयात नेले. तो रस्त्यातच कोसळला होता. रिपोर्टनुसार, श्रेयसची तब्येत आता ठिक आहे. वेलकम ३ च्या सेटवर त्याने सगळ्यांसोबत मस्करी केली. त्याने थोडेसे अॅक्शन असलेले सीक्वेन्स शूट केले. शूट संपल्यानंतर तो घरी परतला आणि त्याने पत्नीला सांगितले की, त्याला अस्वस्थ वाटत आहे. तिने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले पण तो वाटेतच कोसळला."

हे वृत्त समजताच अनेक फॅन्सनी कॉमेंट्स करून प्रार्थना केली. एका फॅनने लिहिले- यार, बेचारा, परमेश्वर त्यांना लवकर ठिक करो. ज्यांनी ज्यांनी हा माझा मेसेज वाचला त्यांनी प्रार्थना करा. दुसऱ्या फॅनने म्हटले, आमचं मन का दुखावत आहेस, भाऊ लवकर बरा हो. तिसऱ्या फॅनने लिहिलं-गेट वेल सून. तो खूप टॅलेंटेड अभिनेता आहे. चौथ्या फॅनने लिहिले- हर हर महादेव…महादेव त्याला लवकर बरे करो. आणखी एका फॅनने लिहिलं – भाई लोक आपल्या परमेश्वर, वाहेगुरू कडे भावासाठी प्रार्थना करा. तो खूप चांगला माणूस आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news