पुढारी ऑनलाईन डेस्क : सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत विरोचक कोण असेल असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. पण त्याचं उत्तर लवकरच मिळणार आहे. नेत्रा, इंद्राणी आणि शेखर या तिघांनाच फक्त कळतं की विरोचक रूपाली आहे. पण रूपाली विरोचक आहे, हे खुद्द रूपालीलाही माहित नाहिये.
संबंधित बातम्या –
जसजशी पंचपिटिका रहस्यातील एकेक पेटी सापडत आहे, त्यातून नवे नवे रहस्य उलगडले जात आहे. तिसऱ्या पेटीतील कोडे सर्पलिपीत असल्यामुळे नेत्रा-इंद्राणीला दिवाडकरांची मदत घ्यावी लागते. सर्पलिपीतील कोड्याचा अर्थ लावताना नेत्रा-इंद्राणीला कळतं की अव्दैत विरोचक नाही, तो आधीच्या जन्मात विरोचकाचा सेवक होता. त्याला त्रिनयना देवीने या जन्मी सातव्या मुलीच्या सातव्या मुलीशी विवाह करून तिचा सारथी होशील असा वर दिला. त्यामुळे नेत्राचा या जन्मातील मृत्यूयोग टळला आहे. कारण त्रिनयना देवीनेच नेत्रा-अव्दैतची लग्नगाठ बांधली आहे.
सध्या मालिकेत नेत्रा अव्दैतला नागापासून वाचवताना दिसली तशीच तिच्यातील देवीचा अंश अधिक जागृत होत चालला आहे, हेही आपण पाहिलं. त्याचप्रमाणे रूपालीमध्ये विरोचकाची शक्ती हळूहळू दिसायला लागली आहे. परंतु रूपालीला तिच्या शक्तीचा अंदाज अजून आलेला नाही.
नेत्रा-इंद्राणी विरोचकाच्या रूपातील रूपालीचा सामना यापुढे कसा करतील, रूपालीला कळेल का ती विरोचक आहे, अव्दैत त्रिनयन देवीच्या इच्छेप्रमाणे नेत्राला यापुढेही साथ देणार का….अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मालिकेत पहायला मिळणार आहेत.