‘जाऊ बाई गावात’: देवदत्त नागे घेऊन आला बैलगाडा शर्यतचा टास्क

devdutt nage
devdutt nage

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठीवरील 'जाऊ बाई गावात' हा शो सध्या चर्चेचा विषय आहे, काही भागातच या कार्यक्रमाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. 'जाऊ बाई गावात' मध्ये पाहुणा आला म्हणजे एक धमाकेदार टास्क असणारच. कोंबडीच्या टास्कमधून स्पर्धक निघाले आणि थेट बैलगाडा शर्यताच्या मैदानात पोहोचले.

संबंधित बातम्या –

स्पर्धकांना गावकऱ्यांसोबत राहून पाच दिवसच झाले आहेत आणि काही स्पर्धकांना जाणीव व्हायला लागली छोट्या छोट्या गोष्टी ज्या शहरात त्यांच्यासाठी खूप सहजपणे उपलब्ध आहेत त्या गावाकडे किती कठीण आहेत. या शहरी मुली कष्ट घेऊन सुख मिळवण्यामध्ये काय आनंद असतो हे शिकताहेत.

'जाऊ बाई गावातचा' वीकएंड खास एपिसोडमध्ये बैलगाडा शर्यतीत कोण यशाचा झेंडा फडकावणार, ते वेळच सांगेल. ही शर्यत तर फक्त एक सुरुवात आहे. वीकएंड खास भागात 'जाऊ बाई गावातच ' पाहिलं एलिमिनेशन होणार आहे. खेळातल्या पहिल्या आठवड्यातच कोणाचा प्रवास थांबणार हे पाहणं रंजक ठरेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news