Anil Kapoor : ‘अॅनिमल’नंतर अनिल कपूरच्या ‘नायक’ चा येणार सीक्वल | पुढारी

Anil Kapoor : 'अॅनिमल'नंतर अनिल कपूरच्या 'नायक' चा येणार सीक्वल

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरचा ( Anil Kapoor) ‘अॅनिमल’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘अॅनिमल’ चित्रपटात अनिल कपूरने रणबीर कपूरच्या वडिलांची म्हणजे, बलवीर सिंहची धमाकेदार मुख्य भूमिका साकारली आहे. अनिल कपूरसोबत चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल, साऊथ स्टार रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी या कलाकांरानी दर्जेदार अभिनय साकारला. सध्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वर्ल्डवाईड ५०० कोंटीचा टप्पा पार केला आहे. याच दरम्यान अनिल कपूरने त्याच्या आणखी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. आगामी ‘नायक’ चित्रपटाचा सिक्वल येत असल्याची माहिती अनिलने स्वत: दिली आहे.

संबंधित बातम्या 

काही दिवसांपूर्वी अनिल कपूरने ( Anil Kapoor) त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘अॅनिमल’ चित्रपटातील कोस्टार बॉबी देओलसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोत दोघेही शर्टलेस दिसले. यावेळी या फोटोच्या कॅप्शनमध्ये अनिलने ”अॅनिमल’ का बाप आणि ‘अॅनिमल’ चा दुश्मन पोझ!’ असे लिहिले होतं. दोघांचा हा फोटो खूपच सोशल मीडियावर व्हायरल झाला.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी दोघांवर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला. दरम्यान एका युजर्सने आता ‘नायक चित्रपटाचा सीक्वल बनवा’ असे सांगत दोघांचे कौतुक केलं होतं. यानंतर अनिल कपूरने स्वत: सोशल मीडियावर या चित्रपटाचा खुलासा करत लवकरच हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीस येत असल्याची माहिती दिली आहे. ही माहिती मिळताच चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

अनिल कपूरचा ‘नायक: द रियल हिरो’ हा चित्रपट २००१ मध्ये रिलीज झाला होता. दिग्दर्शक एस. शंकर यांनी बनवलेल्या ‘नायक’ चित्रपटात अनिल कपूरने एका पत्रकारांची भूमिका साकारली होती. पुढे जावून तो एक दिवस मुख्यमंत्री बनल्यचे दाखविण्यात आलं आहे. चित्रपटात अनिल कपूरसोबत बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीने मुख्य भूमिका साकारली आहे. तर बॉलिवूड अभिनेता अमरिश पुरी, परेश रावल, आणि जॉनी लीव्हर यांनी चित्रपटात काम केलं आहे.

Back to top button