Deepika Padukone Fighter Poster : स्क्वॉड्रन लीडर मीनल राठौडच्या भूमिकेत दीपिका पादुकोण | पुढारी

Deepika Padukone Fighter Poster : स्क्वॉड्रन लीडर मीनल राठौडच्या भूमिकेत दीपिका पादुकोण

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऋतिक रोशनचा चित्रपट ‘फायटर’ सध्या चर्चेत असून आज दीपिका पदुकोणचे या चित्रपटातील नवे पोस्टर रिलीज झाले आहे. (Deepika Padukone Fighter Poster) या चित्रपटात ती स्क्वॉड्रन लीडर मीनल राठौडच्या भूमिकेत दिसणार आहे. नव्या पोस्टरमध्ये दीपिका पदुकोणची स्टाईल अफलातून असून तिच्यामध्ये आत्मविश्वास दिसतो आहे. (Deepika Padukone Fighter Poster)

संबंधित बातम्या –

हा चित्रपट २५ जानेवारी, २०२४ रोजी रिलीज होईल. ऋतिक रोशन मुख भूमिकेत असून दीपिका स्क्वॉड्रन लीडर मीनल राठौडचे पात्र साकारेल. दीपिका पादुकोणने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे.

दीपिका पादुकोणने नवे पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटले आहे-Squadron Leader Minal Rathore. Call Sign: Minni. Designation: Squadron Pilot. Unit: Air Dragons. #FighterOn25thJan #Fighter

दीपिका पायलटच्या लूकमध्ये दिसते. दरम्यान ऋतिक रोशनचा देखील नवे पोस्टर समोर आले होते. या पोस्टरमध्ये माहिती देण्यात आली होत की, ‘फायटर’मध्ये ऋतिक रोशन  स्क्वॉड्रन लीडर शमशेर पठानियाच्या भूमिकेत असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘फायटर’चे प्रमोशन डिसेंबरमध्ये सुरू केले जाईल. हा चित्रपट सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करत आहेत.

Back to top button