Animal Actress Tripti Dimri : इंटिमेट सीन देणारी तृप्ती डिमरी आहे तरी कोण? | पुढारी

Animal Actress Tripti Dimri : इंटिमेट सीन देणारी तृप्ती डिमरी आहे तरी कोण?

पुढारी ऑनलाईन डेस्क : ॲनिमल (Animal) च्या रिलीज आधी तृप्ती डिमरीचे नाव प्रकाशझोतात आले नव्हते. (Animal Actress Tripti Dimri ) परंतु, चित्रपट रिलीजनंतर ती चर्चेत आली आहे. तृप्तीने ॲनिमल चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोबत इंटीमेट सीन देऊन पडद्यावर धुमाकूळ घातला आहे. ॲनिमलमध्ये तृप्तीच्या न्यूड सीनचीदेखील खूप चर्चा होताना दिसतेय. (Animal Actress Tripti Dimri)

संबंधित बातम्या –

संदीप रेड्डी वांगाचा चित्रपट ॲनिमल बॉक्स ऑफिसवर हिट ठरत आहे. चित्रपटगृहात या चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल होत आहेत. ॲनिमलमध्ये रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानासोबत तृप्ती डिमरीदेखील आहे. या चित्रपटामध्ये दोन्ही अभिनेत्रींनी रणबीरसोबत काम केले आहे.

इंटिमेट सीनवर धुमाकूळ

ॲनिमलमध्ये तृप्ती डिमरीने जोयाची भूमिका साकारली होती. चित्रपटामध्ये ती विलेन अबरार हक (बॉबी देओल) च्या साथीने रणविजय सिंह (रणबीर कपूर) ला मारण्यासाठी जाते. या लढाईमध्ये जोयाला रणविजयशी प्रेम होतं.

रातोरात झाली स्टार

रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्यामध्ये दमदार केमिस्ट्री पाहायला मिळाली. स्क्रीनवर दोन्ही जोडीने आपला कमाल दाखवला. अनेक वर्षे इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करत असलेल्या तृप्ती डिमरीला एका चित्रपटाने रातोरात स्टार बनवलं.

कोण आहे ॲनिमलची अभिनेत्री तृप्ती डिमरी?

तृप्ती डिमरीचा जन्म २३ फेब्रुवारी, १९९४ रोजी झाला. ती उत्तराखंडची राहणारी आहे.

बॉलीवूडमध्ये डेब्यू

तृप्ती डिमरीने चित्रपट पोस्टर ब्वॉईज (२०१७) मध्ये करिअरची सुरुवात केली होती. नेटफ्लिक्सचा चित्रपट बुलबुलमध्ये ती दिसली होती. याशिवाय ती चित्रपट कला वरून चर्चेत आली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

 

View this post on Instagram

 

A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

 

View this post on Instagram

 

A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

Back to top button