GTA 6 चा ट्रेलर वेळेआधी रिलीज, नव्या गेम प्लेची झलक पाहा | पुढारी

GTA 6 चा ट्रेलर वेळेआधी रिलीज, नव्या गेम प्लेची झलक पाहा

पुढारी ऑनलाईन डेस्क :  रॉकस्टार गेम्स ने मंगळवारी “ग्रँड थेफ्ट ऑटो ६” चा (Grand Theft Auto 6 ) पहिला ट्रेलर जारी केला. मुख्य ग्रँड थेफ्ट ऑटो मालिकेतील नवा भाग आहे. GTA 6 पुढील वर्षातील सर्वात मोठा ॲक्शन-ॲडव्हेंचर गेम मानला जात आहे. २०१३ चा मेगा-हिट GTA V चा हा पुढील भाग आहे, जो Minecraft नंतर आतापर्यंतचा दुसरा सर्वाधिक विक्री होणारा व्हिडिओ गेम बनला आहे.

संबंधित बातम्या –

Grand Theft Auto 6 (GTA 6) चा ट्रेलर कंपनीने वेळेआधी रिलीज केला आहे. सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर कंपनीचा ट्रेलर लीक झाल्यावनंतर कंपनी ऑफिशियल हँडलवर अपकमिंग व्हिडिओ गेमचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. गेमर्स यांची दीर्घ प्रतीक्षा करत होते. हा गेम आता २०२५ ला उपलब्ध होईल.

वाईस सिटीमध्ये सेट, मियामीवर आधारित मालिकेचा काल्पनिक ट्रेलर असून ट्रेलरमध्ये महिला नायिका लूसिया हिला दाखवण्यात आले आहे. ती आपल्या साथीदारांसोबत गुन्ह्याच्या साखळीत जाताना दिसतेय. रॉकस्टार गेम्सने याची कथा किंवा कहाणीचा खुलासा केलेला नाही. ट्रेलरमध्ये टॉम पेटीचे गाणे “लॉन्ग इज ए लॉन्ग रोड” आहे.

GTA 6 ट्रेलर लीकच्या वृत्ताला पुष्टी देत Rockstar Games ने आपल्या अधिकृत X प्लॅटफॉर्मवर लिहिलंय, “आमचा ट्रेलर लीक झाला आहे. कृपया तुम्ही असली ट्रेलर YouTube वर पाहा.”

दोन तासांत लाखो व्ह्युज

Grand Theft Auto 6 गेमची क्रेज इतकी आहे की, केवळ २ तासात ११ मिलियन व्ह्युज मिळाले आहेत.

Back to top button