Koffee With Karan 8 : लग्नाबद्दल कियाराचा मोठा खुलासा; सिद्धार्थविषयी म्हणाली... | पुढारी

Koffee With Karan 8 : लग्नाबद्दल कियाराचा मोठा खुलासा; सिद्धार्थविषयी म्हणाली...

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता विकी कौशल या आठवड्यात करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ८’ ( Koffee With Karan 8 ) शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. या शोचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. यादरम्यान कियारा आणि विकीने त्याच्या आयुष्यातील रंजक गोष्टीचा खुलासा केला आहे.

संबंधित बातम्या

अभिनेत्री कियारा आडवाणीने करण जोहरच्या या चॅट शोमध्ये ब्लॅक ऑफ व्हाईट शोल्डर गाऊन घातला होता. कियारा या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी कियाराने तिचे मोकळे केस आणि मेकअप केला होता. तर विकी कौशलने कियाराशी जुळणारा काळ्या रंगाचा कोट आणि पँटमध्ये दिसला होता. या चॅट शोमध्ये कियाराने पती सिद्धार्थच्या प्रपोजबद्दल आणि विकीने कॅटरिना कोणत्या नावाने हाक मारते याबद्दलची माहिती दिली आहे.

यावेळी करण जोहरने कियाराला तुझा पती सिद्धार्थ मल्होत्रा आणि विकी कौशल या शोमध्ये आला होता असे म्हटलं. यावर उत्तर देताना कियाराने सांगितले की, या शोमध्ये येण्यापूर्वी सिद्धार्थने मला प्रपोज केले असल्याची माहिती दिली आहे. कियाराचे हे बोलणे ऐकताच विकी आणि करण जोहर आश्चर्यचकित झाले आहेत. यानंतर करण जोहर विकी आणि कियारासोबत गेम खेळतो.

दरम्यान करणने विकीला पत्नी कॅटरिना त्याला कोणत्या नावाने हाक मारते असे विचारतो. याचे उत्तर देताना विकीने हसत-हसत ‘बेबो’ आणि ‘बेबी’ म्हणत असल्याचे सांगितले आहे. यानंतर कियारा आम्ही एकमेंकाना ‘मंकी’ असे म्हणत असल्याचे सांगते. दरम्यान दोघांनी या शोमध्ये अनेक गोष्टी शेअर करत डान्स आणि मोजमस्ती केली आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, विकी आणि कियारा शेवटचे ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली. दोघांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर, विकी नुकताच ‘सॅम बहादूर’ चित्रपटात दिसला आहे. तर कियारा ‘सत्यप्रेम की कथा’ मध्ये दिसली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

Back to top button