CID Actor Dinesh Phadnis : 'सीआयडीतील फ्रेडरिक' दिनेश फडणीस यांना हार्ट ॲटॅक नाही, तर... | पुढारी

CID Actor Dinesh Phadnis : 'सीआयडीतील फ्रेडरिक' दिनेश फडणीस यांना हार्ट ॲटॅक नाही, तर...

पुढारी ऑनलाईन डेस्क : सीआयडीमध्ये फ्रेडरिकची भूमिका साकारलेले अभिनेते दिनेश फडणीस यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (CID Actor Dinesh Phadnis) त्यांना हार्ट ॲटॅक आल्याचे वृत्त समोर आले हते. आता अभिनेते दयानंद शेट्टी यांनी दिनेश फडणीस यांच्या प्रकृतीविषयी अपडेट दिली असून फडणीस यांना हार्ट ॲटॅक आल्याचे वृत्त नाकारले आहे. (CID Actor Dinesh Phadnis)

संबंधित बातम्या –

दिनेश फडणीस यांना आला नाही हार्ट ॲटॅक

एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, दयानंद शेट्टी म्हणाले, ‘दिनेश फडणीस रुग्णालयात दाखल आहेत आणि वेंटिलेटरवर आहेत. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना हार्ट ॲटॅक आला नाही. आता यावर मी कॉमेंट करू इच्छित नाही.’

रिपोर्ट्सनुसार, Tunga हॉस्पिटलमध्ये दिनेश फडणीस यांच्यावर उपचार सुरु आहेत. दिनेश यांची प्रकृती पहिल्यापेक्षा उत्तम आहे. दरम्यान, सीआयडी मालिकेतील सहकलाकार देखील त्यांची भेट घ्यायला हॉस्पिटलमध्ये गेल्याची माहिती मिळतेय.

या मालिकेतून लोकप्रिय झाले दिनेश

दिनेश यांना सीआयडीमध्ये इन्स्पेक्टर फ्रेडरिकची भूमिका साकारली होती. शोमध्ये त्यांचे पात्र प्रसिद्ध झाले होते. अनेक वर्षे या शोमध्ये त्यांनी काम केलं होतं. दिनेशची कॉमेडी फॅन्सना आवडत होती. तर दयानंद शेट्टी यांनी सीआयडी मालिकेत इन्स्पेक्टर दयाची भूमिका साकारली होती.

दिनेश यांचे चित्रपटातही काम

सीआयडीशिवाय दिनेश तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये दिसले होते. या मालिकेत त्यांचा कॅमियो होता. ते आमिर खानचा चित्रपट सरफरोशमध्येदेखील दिसले होते. दिनेश मराठी चित्रपट भरला हा मळवट रक्ताने या चित्रपटातही दिसले होते.

Back to top button