Animal Collection : रणबीरच्या 'अॅनिमल'नं पकडली गती, 'सॅम बहादूर'ची पिछेहाट; तिसऱ्या दिवशी ७१ कोटींची टप्पा पार | पुढारी

Animal Collection : रणबीरच्या 'अॅनिमल'नं पकडली गती, 'सॅम बहादूर'ची पिछेहाट; तिसऱ्या दिवशी ७१ कोटींची टप्पा पार

पुढारी ऑनलाईन डेस्क : संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सलग तिसऱ्या दिवशी धुमाकूळ घातला आहे. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांचा मुख्य भूमिका असेलला हा चित्रपट १ डिसेंबर रोजी थिअटरमध्ये रिलीज झाला. हा चित्रपट रिलीज होताच चाहत्यांनी ‘अॅनिमल’ मधील रणबीर आणि रश्मिकांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केलं. गेल्या दोन दिवसांत चित्रपटाने ( Animal Collection ) ६६. २७ कोटींची भऱघोष अशी कमाई करत विकेंटच्या तिसऱ्या दिवशी धुमाकूळ घातला. दरम्यान, १ डिेसेंबर रोजीच ‘अॅनिमल’ सोबत बॉलिवूड अभिनेता विकी कौशल्यचा ‘सॅम बहादुर’ हा चित्रपटही रिलीज झाला. दोन्ही चित्रपट एकमेंकांना टक्कर देण्यास सज्ज होते. मात्र, बॉक्स ऑफीसवरील कमाईच्या बाबतीत ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट पिछेहाट पाहायला मिळाली.

संबंधित बातम्या 

sacnilk च्या रिपोर्टनुसार, अभिनेता रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ ( Animal Collection ) हा विकेंटला म्हणजे, रविवारी सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूडमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने ओपनिंगच्या पहिल्या दिवशी म्हणजे, शुक्रवारी ६३.८ कोटींची, दुसऱ्या दिवशी म्हणजे, शनिवारी ६६. २७ कोटींची भरघोष अशी कमाई केली. आणि विकेंटच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे, रविवारी या चित्रपटाने जबरदस्त बॉक्स ऑफिसवर ७१. ४६ कोटींची कमाई केली आहे. आतापर्यत एकूण या चित्रपटाने २०१.५३ कोटींची कमाई केली आहे.

तर ‘अ‍ॅनिमल’ने जगभरात दोन दिवसांत २३६.०० कोटींची कमाई केली होती. आणि तिसऱ्या दिवशीचा कमाईचा आकडा मिळून आतापर्यत ३५६ कोंटीची चित्रपटाने कमाई केली. दरम्यान रणबीरच्या अॅनिमलचे कमाईचे वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, याच दिवशी म्हणजे, १ डिसेंबरला बॉलिवूड अभिनेता विकी कौशल्यचा ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट ‘अॅनिमल’ला टक्कर देत होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर मागे पडला.

sacnilk च्या माहितीनुसार, ‘सॅम बहादूर’ने पहिल्या दिवशी ६.२५ कोटींची कमाई करत ओपनिंग केले. दुसऱ्या दिवशी ९ कोटींची आणि तिसर्‍या दिवशी चित्रपटाने १०. ३० कोटींची कमाई केली. आतापर्यत या चित्रपटाने तीन दिवसांत एकूण २५.५५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात विकी कौशलसोबत सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख यांनी भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या आकडेवारीवरून रणबीरच्या ‘अॅनिमल’ला चाहत्यांचा प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास येत आहे. तर ‘सॅम बहादुर’ मागे पडत असल्याचे समजते.

Back to top button