Boycott TMKOC : ‘तारक मेहता’ मध्ये दयाबेनची नो एन्ट्री; बहिष्कार टाकत बॉयकॉटची मागणी

Boycott TMKOC : ‘तारक मेहता’ मध्ये दयाबेनची नो एन्ट्री; बहिष्कार टाकत बॉयकॉटची मागणी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ( Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या घराघरात पोहोचली आहे. या मालिकेतील जेठालाल आणि दयाबेनची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. मात्र, मध्यंतरी दयाबेनची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वाकाणीने काही कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेतला. यानंतर मालिकेतील नवनविन कलाकारांची एन्ट्री झाली. मात्र, चाहत्याच्यात अजूनही दयाबेनची एन्ट्री कधी होते यासाठी उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. दरम्यान मालिकेत पुन्हा दयाबेन परतणार असल्याची चर्चा रंगू लागली खरी. मात्र, पुन्हा चाहत्यांच्या पदरी निराशात पडली आहे. यामुळे या मालिकेत पुन्हा दयाबेन येणार की नाही? यावर अनेक तर्क – वितर्क लावले जात आहेत. खरे काय आहे? हे पुढील भागात समजणार आहे. ( Boycott TMKOC )

संबंधित बातम्या 

अभिनेत्री दिशा वाकाणी दयाबेनच्या भूमिकेत पुनरागमन करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून रंगली होती. आता मालिकेत गोकुलधाममध्ये दयाबेन परत येणार असल्याने चाहत्यासह जेठालालही आंनदीत असल्याचे दाखविले आहे. दरम्यान मालिकेत जेठालालने सुंदरलाल की सोसायटीमधील सर्वांना बोलावून दयाबेन येत असल्याची माहिती दिली. मात्र, त्याच्या सोसायटीत एक कार आली. परंतु, त्या कारमध्ये कोणीच नव्हते. यामुळे जेठालालसह सोसायटीतील सर्व जण पुन्हा एकदा नाराज झाले.

हा सीन मालिकेत दाखवल्यानंतर चाहत्यांत नाराजी सुर पसरला. या घटनेमुळे सोशल मीडियावरील काही नेटकऱ्यांनी मालिकेवर बहिष्कार टाकला आहे. तर काहींनी या मालिकेत दयाबेन पुन्हा दिसणार नाही म्हणून निर्मात्यावर रोष व्यक्त केलाय. तर दुसरीकडे या मालिकेचा बॉयकॉट करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यानच सोशल मीडियावर Boycott TMKOC असा हॅशटॅग सुरू झाला आहे.

दिशा वाकानीने २००८ मध्ये मालिकेमध्ये दयाबेनची मुख्य भूमिका साकारली होती. यानंतर शोमधील कामगिरीने तिला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. तर सप्टेंबर २०१७ मध्ये ती काही कारणास्तव मालिकेतून बाहेर पडली आणि पुन्हा परतली नाही. ( Boycott TMKOC )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news