Taarak Mehta Ka Ooltah Chashma : ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ शो चे निर्माता असित मोदी यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल | पुढारी

Taarak Mehta Ka Ooltah Chashma : 'तारक मेहता का उलटा चश्मा' शो चे निर्माता असित मोदी यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाइन डेस्क : Taarak Mehta Ka Ooltah Chashma : सब टीव्हीचा प्रसिद्ध टीव्ही शो ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या शो चे निर्माता असित मोदी यांच्यासह एक्झिक्यूटिव्ह प्रोड्यूसर जतिन बजाज आणि ऑपरेशन हेड सोहेल रमानी यांच्यावर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी शो मधील मिसेज सोढी यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री जेनिफर मिस्त्री यांनी या तिघांवर लैंगिक छळाचे आरोप केले होते.

जेनिफर यांच्या तक्रारीनंतर पोवाई पोलिसांनी या असित मोदी, जतिन बजाज आणि सोहेल रमानी यांच्याविरोधात भारतीय दंडविधान संहितेचे कलम 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दोन्ही कलमे एखाद्या महिलेवर तिचा विनयभंग करण्याच्या हेतूने करण्यात आलेला हल्ला किंवा बळजबरी करणे या प्रकरणांमध्ये लावण्यात येतात. मात्र, सध्या या कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. परिणामी असित मोदी आणि अन्य दोघांच्या अडचणीत वाढ झाल्या आहेत.

Taarak Mehta Ka Ooltah Chashma : जेनिफर मिस्त्रीच्या तक्रारीनंतर अन्य कलाकारांनी देखील या शो विषयी तक्रारी नोंदवल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी कामात येणाऱ्या अडचणींबाबत खुलासा केला होता. पोलिसांनी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री यांचे जबाब नोंदवले आहेत. तर लवकरच असित मोदी यांना त्यांच्या जबाबासाठी समन्स नोंदवू शकतात.

Taarak Mehta Ka Ooltah Chashma : असित मोदींनी आरोप फेटाळले

असित मोदी यांनी जेनिफर यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले आम्ही कायदेशीर कारवाई करू. जेनिफरला शो मधून काढून टाकल्यानंतर ती आमच्यावर हे निराधार आरोप करून माझी आणि शो ची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashma : सोहेल आणि जतीन यांनी देखील आरोप फेटाळले

एक्झिक्यूटिव्ह प्रोड्यूसर जतिन बजाज आणि ऑपरेशन हेड सोहेल रमानी यांनी एक निवेदन जारी करत आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. अभिनेत्री जेनिफर मिस्त्री शोमधील संपूर्ण टीमशी नियमितपणे गैरवर्तन करत होती. शूटमधून बाहेर पडताना, तिने आपल्या मार्गातील लोकांची पर्वा न करता अतिशय वेगाने तिची कार बाहेर काढली. सेटच्या मालमत्तेचे नुकसान झाले. शूटिंगदरम्यान तिच्या वाईट वागणुकीमुळे आणि अनुशासनहीनतेमुळे आम्हाला तिचा करार रद्द करावा लागला.

या घटनेच्या वेळी असित जी अमेरिकेत होते. ती आता बिनबुडाचे आरोप करून आमची आणि शोची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. या बिनबुडाच्या आरोपांविरुद्ध आम्ही संबंधित अधिकार्‍यांकडे आमची तक्रार आधीच दाखल केली आहे.

हे ही वाचा :

Shailesh Lodha Birthday : तारक मेहता फेम शैलेश लोढाबद्दल जाणून घ्या..

Disha Vakani : ‘तारक मेहता’ फेम दयाबेनला कॅन्सर झाल्याचे वृत्त

Disha Wakani : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील दिशाच्या घरी पुन्हा हलला पाळणा, मुलाला दिला जन्म

Back to top button