Malvika Raaj : ‘कभी खुशी कभी गम’ फेम अभिनेत्रीने गुपचूप केलं लग्न (Video) | पुढारी

Malvika Raaj : 'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्रीने गुपचूप केलं लग्न (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : कभी खुशी कभी गममध्ये यंग करीना कपूरची भूमिका साकारणारी मालविका राजने गुपचूप लग्न उरकले आहे. (Malvika Raaj) तिचे लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसताहेत. २००१ मध्ये रिलीज झालेला चित्रपट अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, काजोल, ऋतिक रोशन, करीना कपूरचा ‘कभी खुशी कभी गम’ सुपरहिट ठरला होता. या चित्रपटामध्ये छोट्या पू ची भूमिका खूप फेमस झाली होती. ती भूमिका साकारणारी अभिनेत्री मालविका राज (Malvika Raaj) होती. मालविका आज ३० वर्षांची झाली आहे.

संबंधित बातम्या –

इतकेच नाही तर ती लग्नाच्या बंधनात अडकली आहे. तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

पहिल्या व्हिडिओमध्ये वधू वेषात मालविका राज यलो कलरच्या सुंदर लहंगामध्ये दिसत आहे. तर पोज देताना ती खूप स्टायलिश वधू दिसत आहे. याआधी अभिनेत्री मालविका राजने बिझनेसमन प्रणव बग्गासोबत आपल्या साखरपुड्याची घोषणा एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून केली होती. तिने लिहिले होते, “येथे आम्ही आहोत. आम्हीही सुरुवात केली आहे, इतक्या वेळेनंतर आमची वेळ आलीय. आताही आम्ही मजबूत बनलो आहोत. IvBeenWaitingForYou #ILoveYou.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Malvika Raaj (@malvikaraaj)

 

View this post on Instagram

 

A post shared by Malvika Raaj (@malvikaraaj)

Back to top button