शेलार Vs ठाकरे : “ठाकरे सरकार अराजकतावाद्यांचे समर्थक”

शेलार Vs ठाकरे : “ठाकरे सरकार अराजकतावाद्यांचे समर्थक”
Published on
Updated on

"ठाकरे सरकार (शेलार Vs ठाकरे) हे गुन्ह्याचे, गुन्हेगारांचे, आतंकवादाचे, अलगाववाद्यांचे आणि अराजकता माजवणाऱ्यांचे समर्थक असून ठाकरे सरकारकडून महाराष्ट्रातील हिंदू धर्म आणि महाराष्ट्र धर्मावर घाला घालण्यात येत आहे. त्या विरोधात भाजपा संघर्ष करेलच, जनतेनेही हा घाला परतवून लावायला हवा", अशा शब्दांत भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी प्रदेश कार्यकारीणीमध्ये ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश कार्यकारीणी बैठकीत भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी "राजकारणाचे गुन्हेगारीकरण" या विषयावर आपले विचार मांडताना ठाकरे सरकारच्या दोन वर्षांच्या कालखंडाचा समाचार घेत हे सरकार महाराष्ट्र धर्म आणि हिंदू विरोधी असल्याची खरमरीत टीका केली. भाजपा महाराष्ट्र प्रभारी सी.टी. रवी, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश,  राष्ट्रीय सरचिटणीस दिलीप सैकीया, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आज दादर येथे झाली.

यावेळी आमदार ॲड आशिष शेलार म्हणाले की, "ठाकरे सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर पहिल्यांदा नागरिकांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्यात आला. त्यानंतर आणीबाणी सारखी अघोषित परिस्थिती निर्माण केली गेली.  त्यानंतर मात्र ठाकरे सरकारच्या दोन वर्षांचे वर्णन करायचे झाले तर प्रथम गुन्ह्यांचे समर्थन करण्यात आले तर पुढच्या टप्प्यात गुन्हेगारांचे समर्थन करण्यात आले. त्यानंतर आतंकवादाचे समर्थन करण्यात आले त्यानंतर अलगाववाद्यांचे समर्थन करण्यात आले  आणि आता चौथ्या टप्प्यात ठाकरे सरकारकडून अराजकतावाद्यांचे समर्थन आणि संरक्षण करण्यात येते आहे."

"एक मंत्री तर १९९३ च्या बाँम्ब स्फोटातील प्रमुख आरोपी असलेल्या याकूब मेमनच्या फाशीचा विरोधक आहे तर अल्पसंख्याक मंत्री तर दाऊची बहिण हसिना पारकरचा कट्टर समर्थक असलेल्या सलिम पटेलसोबत आर्थिक व्यवहार करतात. १९९३ बाँम्ब स्फोटातील शिक्षा भोगत असलेल्या आरोपी सरदार शहावली खान सोबत आर्थिक व्यवहार करतात. मुख्यमंत्री याबाबत चकार शब्द काढायला तयार नाहीत. शर्जिल उस्मानीला रेडकार्पेट घातले जाते. आझाद काश्मिरचा बोर्ड फडकवणा-या मेहक प्रभूवरील गुन्हा मागे घेतला जातो", असंही ॲड आशिष शेलार म्हणाले.

"कायदा, फौजदारी दंड संहिता, भारतीय दंड संहिता आणि संविधान हे सर्व मोडिस काढण्याचे काम ठाकरे सरकारकडून करण्यात येत आहे. या राज्यातील तक्रारदार सुरक्षित नाही. तपास अधिकारी, साक्षीदार सुरक्षित नाही. तर पोलिसांना वसूलीची कामे दिली जात आहेत. ज्या रश्मी शुक्ला यांनी पोलिस बदलीतील भ्रष्टाचार उघड केला त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले जात आहेत. सीबीआयच्या प्रमुखांना मागच्या कुठल्या तरी घटनेत बोलावून घेतले जात  आहे. असे भयाण चित्र महाराष्ट्रात आहे. दुसरीकडे पालघरमध्ये सांधूंना मारले जाते, गणेशोत्सव, दहिहंडी उत्सवावर बंदी आणली जाते. वारकऱ्याला पंढरपूरात जाऊ दिले जात आहे. राम मंदिराच्या तारखेची आणि राम वर्गणीची खिल्ली  उडवली जाती. त्यामुळे महाराष्ट्रात हिंदू सुरक्षित नाही तसाच महाराष्ट्र धर्मही सुरक्षित नाही", अशा शब्दाxत आमदार  अँड आशिष शेलार यांनी ठाकरे (शेलार Vs ठाकरे) सरकारचा समाचार घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news