Marathi Movie : एक दोन तीन चारचा धमाकेदार टीझर रिलीज | पुढारी

Marathi Movie : एक दोन तीन चारचा धमाकेदार टीझर रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे निर्मित एक नवीकोरी कथा असलेला “एक दोन तीन चार” हा चित्रपट येत्या नवीन वर्षात ५ जानेवारी २०२४ रोजी आपल्या भेटीस येत आहे.  (Marathi Movie) जिओ स्टुडिओजचा बहुप्रतीक्षित ‘झिम्मा २’ आज प्रदर्शित होत आहे. या मल्टिस्टारकास्ट चित्रपटासोबतच ”एक दोन तीन चार” चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा डबल बोनस ठरणार हे नक्की. (Marathi Movie)

संबंधित बातम्या – 

या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘मुरांबा‘ या बहुचर्चित चित्रपटानंतर वरूण नार्वेकर या दिग्दर्शकाचा हा पुढील चित्रपट असणार आहे. तर या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांनी मिळून लिहिले आहेत.

जिओ स्टुडिओजच्या या नव्या चित्रपटात कलाकारांची दमदार टीम दिसणार आहे. चित्रपटातील मध्यवर्ती पात्र असलेल्या सायलीची भूमिका वैदेही परशुरामी हिने साकारली आहे तर समीरची भूमिका निपुण धर्माधिकारीने साकारली आहे. याव्यतिरिक्त मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर, यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत. यानिमित्ताने वैदेही आणि निपुण ही नवीन जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे तर या चित्रपटाच्या माध्यमातून निपुण धर्माधिकारी एक मोठी मध्यवर्ती भूमिका पहिल्यांदाच साकारताना दिसणार आहे.

जिओ स्टुडिओजबरोबर या चित्रपटाची निर्मिती रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले यांच्या बहावा एन्टरटेन्मेंट आणि १६ बाय ६४ यांनी केली आहे.

Back to top button