Singham Again : ‘सिंघम अगेन’मधून अजय देवगनचा फर्स्ट लूक रिलीज

ajay devgan
ajay devgan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता अजय देवगनचा 'सिंघम अगेन' चित्रपट चर्चेत आहे. पुन्हा एकदा तो बाजीराव सिंघम बनून ॲक्शन करतना दिसणार आहे. निर्माता रोहित शेट्टी फ्रेंजायजी चित्रपट 'सिंघम 3' मधील स्टार्सचे लूक उघड करताना दिसत आहे. (Singham Again) काही दिवसांपूर्वी चित्रपटातून करीना कपूरचा लूक रिवील करण्यात आला होता. आज निर्मात्यांनी अजय देवगनचा दमदार पोस्टर जारी केला आहे. (Singham Again)

संबंधित बातम्या –

'सिंघम अगेन' चे पोस्टर रोहित शेट्टीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या नव्या पोस्टरमध्ये अभिनेता अजय देवगन वाघासारखा पळताना दिसतोय. पोस्टरच्या बॅकग्राऊंडमध्ये अजय देवगनसोबत वाघाचा फोटो देखील दिसत आहे. रोहित शेट्टीने पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय- 'शेर आतंक मचाता है, और जख्मी शेर तबाही। सबका पसंदीदा पुलिसकर्मी, बाजीराव सिंघम वापस आ गया है।

या चित्रपटात रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण देखील आहेत. हा चित्रपट २०२४ मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने रिलीज होईल. हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा-२' ने क्लॅश करेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news