Sukhee Movie : शिल्पा शेट्टीचा ‘सुखी’ ओटीटीवर टॉपला

Sukhee Movie : शिल्पा शेट्टीचा ‘सुखी’ ओटीटीवर टॉपला

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शिल्पा शेट्टी कुंद्राचा नवीन चित्रपट 'सुखी' ( Sukhee Movie ) हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. वीकेंडमध्ये नेटफ्लिक्सवर नंबर १ ट्रेंडिंग चित्रपटात त्याने स्थान मिळवले आहे. या चित्रपटात शिल्पा मुख्य भूमिकेत आहे. ज्यामध्ये तिने सुखप्रीत 'सुखी' कालरा ही एक ३८ वर्षीय पंजाबी गृहिणीची भूमिका साकारली आहे. शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्रामवर याबाबतची माहिती देताना एक पोस्ट शेअर केली आहे.

संबंधित बातम्या 

या पोस्टमध्ये शिल्पा व्यायाम करत टीव्ही पाहताना दिसतेय. यावेळी टिव्हीवर तिचा मराठी 'सुखी' ( Sukhee Movie ) चित्रपट नेटफ्लिक्सवर पहिल्या नंबरवर पोहचल्याचे दाखविले आहे. यानंतर शिल्पाला खूपच आनंद झाला असून तिने मोठमोठ्याने ओरडतानाही दिसत आहे. या व्हिडिओत शिल्पाच्या घरातील उतरही साहित्यही दिसत आहे. यात खास करून, ती ट्रेड मिल वाकिंग मशीनवर व्यायाम करत आहे. शिल्पाची ही पोस्ट सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

या पोस्टला कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, '@netflix_in वर #Sukhee नंबर १ वर ट्रेंड करत आहे!, दिवसाची चांगली सुरुवात झाली, स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकासाठी SUKHEE तुमच्यासाठी !'. शिल्पाचा 'सुखी' हा चित्रपट सगळ्यांना प्रेरणा देणारा ठरला आहे.

यानंतर शिल्पा बॉलिवूड आयकॉन रोहित शेट्टीच्या आगामी वेबसिरीज "भारतीय पोलिस दल" मध्ये ओटीटी ( OTT ) पदार्पण करण्यास सज्ज आहे. याशिवाय शिल्पाचा "KD- द डेव्हिल" नावाचा एक कन्नड चित्रपट लवकरच येणार आहे.

logo
Pudhari News
pudhari.news