HBD Tusshar Kapoor : सिंगल पॅरेंट आहे तुषार कपूर, लग्नाशिवाय आयव्हीएफच्या माध्यमातून बनला होता पिता

tushar kapoor
tushar kapoor
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट जगतात अनेक सेलिब्रिटी सिंगल पॅरेंट्स झाले आहेत. (HBD Tusshar Kapoor ) पण, लग्नाविना बाबा होऊन तुषार कपूरने सर्वांसाठी एक उत्तम उदाहरण सेट केलं आहे. १ जून, २०१६ रोजी सरोगेसीच्या माध्यमातून तुषार एका मुलाचा पिता झालाय त्याचे नाव त्याने लक्ष्य ठेवलं आहे. चित्रपट निर्माता प्रकाश झा यांच्या प्रेरणेने तुषारने हा निर्णय घेतला होता. (HBD Tusshar Kapoor )

संबंधित बातम्या –

मुझे कुछ कहना हैमधून डेब्यू

२० नोव्हेंबर, १९७६ रोजी तुषार कपूरचा जन्म झाला. 'मुझे कुछ कहना है'मधून त्याने बॉलीवूडमध्ये डेब्यू केलं होतं. हा तेलुगु चित्रपट 'थोली प्रेमा'चा रिमेक होता. पहिल्या चित्रपटासाठी तुषारला बेस्ट मेल अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. यानंतर त्याने पुढे 'क्या दिल ने कहा', 'ये दिल', 'जीना सिर्फ मेरे लिए' सारखे चित्रपट केले.

आयव्हीएफच्या माध्यमातून पिता झाल्यानंतर त्याने २०२१ मध्ये बॅचलर डॅडी हे पुस्तक प्रकाशित केले होते. पिता झाल्यापासून ते विना पार्टनरच्या मुलांचा सांभाऱ करण्यापर्यंतचे अनुभव त्याने या पुस्तकात लिहिले होते. या पुस्तकात त्याने खुलासा केला होता की, लग्नाशिवाय त्याने पिता बनण्याचा निर्णय का घेतला?

तुषार केवळ अभिनेताच नाही तर एक निर्माता म्हणूनही सिनेमा जगतात कार्यरत आहे. त्याने तुषार एन्टरटेन्मेंट नावाने प्रोडक्शन हाऊसच सुरुवात केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tusshar Kapoor (@tusshark89)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tusshar Kapoor (@tusshark89)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tusshar Kapoor (@tusshark89)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tusshar Kapoor (@tusshark89)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news