Shivani Rangole : शिवानीची सिंगापूर ट्रीप; शॉपिंग अन् खाण्यावर मारला ताव | पुढारी

Shivani Rangole : शिवानीची सिंगापूर ट्रीप; शॉपिंग अन् खाण्यावर मारला ताव

पुढारी ऑनलाईन डेस्क : मस्त बाहेर हिंडायला, फिरायला कोणाला नाही आवडतं? प्रत्येक प्रवास काहीतरी शिकवत असतो. झी मराठीवरील प्रसिद्ध ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील अक्षरा म्हणजे, शिवानी रांगोळे ( Shivani Rangole ) नुकतीच सिंगापुरला गेली होती. यावेळी तिने सिंगापूरमधील ट्रीपचा अनुभव, लोकोशन आणि खाद्य पदार्थाचे फोटो शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या 

शिवानी रांगोळे ( Shivani Rangole ) हिने अनुभव सांगताना म्हटलं आहे की, ‘एक खास प्रोजेक्ट शूट करायला होते. बाहेरगावी शूट म्हणजे, काम आणि मजा या दोन्ही गोष्टी एकत्रित होत असतात. पूर्ण दिवस ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ शूटिंग करून रात्री मुंबईहून सिंगापूरला दोन दिवसासाठी गेले होते. मला नवीन शहरात जायचे कुतुहुल नेहमीच असते. फक्त दोन दिवसात माझा उत्साह गगनात मावेनासा ऐवढा होता. जिथे- जिथे शूट करत होते तिथे तर मी फिरलेच, पण शूटिंग संपल्यावरही मी भटकंती केली.’

सिंगापूरमध्ये ‘गार्डन बाय द बे’, मरिना बे सॅण्डस, मुस्तफा मार्केट आणि लिटल इंडिया इत्यादी ठिकाणी शिवानी फिरली. ‘गार्डन बाय द बे’ चे अद्भुत वास्तुकला माझ्या डोळ्यासमोर अजून ताजी आहे. सर्वात जास्त माझं लक्ष ज्या गोष्टींनी वेधून घेतलं ती म्हणजे, तिकडच्या लोकांच्या मधली शिस्त. अत्यंत स्वच्छ आणि शिस्तबद्ध देश आहे. एक प्रसंग मला तुम्हाला आवर्जून सांगायला आवडेल की, पहाटे २:३० वाजले होते आणि आम्ही शूट संपवून आमच्या गाडीची वाट पाहत होतो. तर तिथे सिग्नलवर एक माणसांनी पूर्ण एक मिनिट आपली गाडी थांबवली होती, कारण तो ट्रॅफिक लाइटचा कायदा पाळत होता. पूर्ण शुकशुकाट असताना ही तो थांबला. नियमाचे पालन केले. या गोष्टीच मला खूप कौतुक वाटलं. मला आपल्या ही देशात असं काही बघायला आवडेल.

जेवणाचं म्हणाल तर, मला नवनवीन पदार्थाची चव चाखायला खूप आवडते. शिवानीने तिथे निरनिराळ्या प्रकारचे वोक बाउलचा आस्वाद घेतला. एक दिवशी मी भारतीय जेवणाची चव चाखायला ही गेली होती. सिंगापूरमध्ये भटकताना माझी गाठ भेट एका पुणेकरशी झाली.
काहीतरी भेट वस्तु घरी घेऊन जायची म्हणून एका दुकानात शॉपिंगसाठी गेले असता तेथे पुण्यातील एक व्यक्ती भेटली. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, ते पुणेकर त्या दुकानाचे मालक होते. योगायोग असा की, त्यांची आई आमचा कार्यक्रम ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ पाहत होते. गप्पा गोष्टींमध्ये कधी वेळ गेला कळालेच नाही. पण ही भेट माझ्यासाठी अनपेक्षित होती आणि ती माझ्या आठवणीत नेहमीच राहील. असे तिने म्हटलं आहे.

मला भटकंती करायची आवड असल्यामुळे, मी खूप नियोजन करून निघत होते, जेव्हा कुठच्याही नवीन ठिकाण गाठायचं असेल, माझी एक टू डू- लिस्ट रेडी असते, माझ्या ट्रॅव्हल पॅकिंगमध्ये एक छोटी बॅक पॅक, एक पुस्तक आणि सार्वत्रिक वापरणारा चार्जर नेहमीच असतो. असेही तिने यावेळी म्हटलं आहे.

 

Back to top button