Salaar : सर्वांना पिछाडीवर टाकणार प्रभासचा सालार, ट्रेलरला काही दिवस बाकी | पुढारी

Salaar : सर्वांना पिछाडीवर टाकणार प्रभासचा सालार, ट्रेलरला काही दिवस बाकी

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार प्रभासच्या ‘सालार’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेटही समोर आली आहे. प्रशांत नीलसोबत प्रभासचा बहुप्रतीक्षित आगामी चित्रपट ‘सालार पार्ट १: सीझफायर’चा ट्रेलर १ डिसेंबरला रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी नुकतीच ट्रेलर लॉन्चची तारीख जाहीर केली आहे.

संबंधित बातम्या –

सालार २२ डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे आणि चित्रपटाभोवतीचा प्रचार पूर्वीपेक्षा मोठा आहे. या महिन्याच्या सुरुवातीला निर्मात्यांनी जाहीर केले होते की, चित्रपट चित्रपटगृहात येण्याच्या सुमारे तीन आठवड्यांपूर्वी नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला ट्रेलर लॉन्च केला जाईल.

‘सालार’ हा प्रभास आणि प्रशांत नील यांचा पहिला एकत्र चित्रपट आहे. हा दिग्दर्शकाचा पहिला तेलुगु प्रोजेक्ट आहे. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, जगपती बाबू, श्रुती हासन, टिनू आनंद, ब्रह्माजी, ईश्वरी राव मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे संगीत रवी बसरूर यांनी दिले आहे. हा चित्रपट तेलगू, कन्नड, तामिळ, मल्याळम, हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Back to top button