Model luana andrade : चरबी घालवण्यासाठी केली कॉस्मेटिक सर्जरी, जीव गमावून बसली | पुढारी

Model luana andrade : चरबी घालवण्यासाठी केली कॉस्मेटिक सर्जरी, जीव गमावून बसली

पुढारी ऑनलाईन डेस्क – ब्राझीलची २९ वर्षीय इन्फ्लुएन्सर, अभिनेत्री लुआना एंड्रेला आपला जीव गमवावा लागला. आपल्या ( luana andrade) गुडघ्याजवळील चररबी कमी करण्यासाठी लुआना लिपोसक्शन करायला गेली होती. यावेळी सर्जरी करताना मॉडल लुआना एंड्रेला हिला ४ वेळा हार्टॲटॅक आला आणि तिचा मृत्यू झाला. (Brazilian influencer luana andrade)

लुआना ब्राझीलमध्ये साऊथ ईस्टर्न शहर साओ पाउलोमध्ये राहते. लुआना एका रुग्णालतात सर्जरी करण्यासाठी पोहोचली होती. जवळपास अडीच तास सर्जरी नंतर तिला हार्टॲटॅक आला, त्यानंतर तत्काळ सर्जरी थांबवण्यात आली. त्यानंतर तिच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या. रक्तवाहिन्यांमध्ये रक्त प्रवाहित होण्यास बाधा आली आणि सर्जरीच्या वेळी एकानंतर एक तिला ४ हार्टॲटॅक आले.
डॉक्टरांनी हादेखील दावा केला की, सर्जरीच्या आधी झालेल्या तपासणीत लुआनाचे आरोग्य ठिक होते. ऑपरेशनच्या आधी सर्व गोष्टींची काळजी घेऊन तपासी करण्यात आली होती, तरीदेखील ही दुर्घटना घडली.

Back to top button