Tiger 3 : अ‍ॅडव्हान्स बुकिंगद्वारे ‘टायगर – 3’ची 7.46 कोटींची कमाई | पुढारी

Tiger 3 : अ‍ॅडव्हान्स बुकिंगद्वारे ‘टायगर - 3’ची 7.46 कोटींची कमाई

अभिनेता सलमान खान हा सध्या आगामी सिनेमा ‘टायगर-3’ मुळे खूपच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला होता. आता ‘टायगर-3’ सिनेमाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. भारतात या सिनेमाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला 5 नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली. यानंतर 24 तासांत ‘टायगर-3’ ची सुमारे एक लाख 40 हजार तिकिटांची विक्री झाली आहे. आतापर्यंत या सिनेमाची 2 लाख 66 हजार 995 तिकिटे विकली आहेत. अ‍ॅडव्हान्स बुकिंगद्वारे या सिनेमाने 7.46 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. दिल्लीतील रिंग रोडवरील सिनेमागृहांनी 24 तास ‘टायगर-3’ या सिनेमाचे शो सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. देशातील अनेक भागांमधून चाहत्यांनी ‘टायगर-3’ या सिनेमाचे 24 तास शो सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. तर दुबईतील ‘वॉक्स’ सिनेमा चित्रपटगृहात रात्री 12.05 वाजता ‘टायगर-3’ या सिनेमाचा शो आयोजित केला आहे. तर सौदी अरबियामध्ये मध्यरात्री 2 वाजता या सिनेमाचे शो दाखवण्यात येणार आहे. ‘टायगर-3’ हा सिनेमा 12 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Back to top button