रश्मिकाला एकवेळ चालताही येत नव्हते! | पुढारी

रश्मिकाला एकवेळ चालताही येत नव्हते!

अभिनेत्री रश्मिका मंदाना दाक्षिणात्यसह बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तिच्या चाहत्यांचीही संख्याही खूप आहे. आता रश्मिकाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. एक वेळ अशी होती की, रश्मिकाला उभेही राहाता येत नव्हते. रश्मिकाच्या गुडघ्यांना गंभीर दुखापत झाली होती. यामुळे रश्मिकाला चालताही येत नव्हते. डान्स केल्यामुळे रश्मिकाच्या गुडघ्यांना दुखापत झाली होती. पण, आता तीची प्रकृती ठणठणीत आहे. गेल्या काही दिवसांपासून रश्मिकाचा एक फेक व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. फेक व्हिडीओ डीपफेक या सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. डीपफेक हा एक प्रकारचा सिंथेटिक मीडिया आहे. फेक व्हिडीओवर रश्मिकानेही प्रतिक्रिया दिली. फेक व्हिडिओमुळे खूपच त्रास झाला असल्याचे रश्मिकाने म्हटले आहे. यावर महानायक अमिताभ बच्चन यांनीही कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Back to top button