कायदा फक्त साहेबाचाच!; ‘सुंदरी’ मध्ये वनिता खरात डॅशिंग भूमिकेत | पुढारी

कायदा फक्त साहेबाचाच!; ‘सुंदरी’ मध्ये वनिता खरात डॅशिंग भूमिकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : वनिता खरात हे नाव महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांत पोहोचलं आहे. प्रेक्षकांना पोटधरुन हसायला लावणारी अभिनेत्री वनिता खरात, आता प्रेक्षकांच्या मनात दरारा निर्माण करणारी भूमिका साकारणार आहे. कारण वनिता खरातला यापूर्वी कधीही न पाहिलेल्या, खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अर्थात, ती या भूमिकेमधून देखील प्रेक्षकांची मनं जिंकून घेणार आहे.

संबंधित बातम्या 

‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’ या मालिकेचे नवीन पर्व नुकतेच सुरु झाले आहे. या नवीन पर्वात सुंदरीच्या आयुष्याचा नवीन प्रवास सुरु झाला आहे, आणि तिचा हा नवीन प्रवास आव्हानात्मक असणार आहे. अनेक अडचणींना सुंदरीला अगदी धीराने सामोरं जावं लागणार आहे, त्यातील एक अडचण म्हणजे ‘साहेब’.

‘साहेब’ या नावाप्रमाणेच त्या व्यक्तीचं व्यक्तीमत्व देखील भारदस्त, बेधडक, जिगरबाज असणार आहे. अगदी तसंच आहे, पण ही व्यक्ती पुरुष नसून स्त्री आहे. आणि ‘साहेब’ या खलनायिकेची भूमिका वनिता खरात साकारत आहे. नुकताच वनिताच्या भूमिकेचा प्रोमो सोशल मिडियावर प्रदर्शित झाला असून वनिताला या अनोख्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

‘तू जरी असली कलेक्टर तरी, कायदा हा साहेबाचा चालतो’, या दमदार डायलॉगमुळे वनिताच्या भूमिकेचा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आता साहेब आणि सुंदरी समोरासमोर आल्यावर नेमकं काय होणार? यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sun Marathi (@sunmarathi)

Back to top button