Tula Shikvin Changlach Dhada : अक्षरा अधिपतीमध्ये फुलणार प्रेमाचं नातं!

Tula Shikvin Changlach Dhada
Tula Shikvin Changlach Dhada

पुढारी ऑनलाईन डेस्क : नोव्हेंबर महिना सुरु झाल्याने सगळीकडे दिवाळीची लगबग चालू आहे. प्रत्येकाच्या घरात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. यासोबत प्रेक्षकांची आवडती मालिका 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत दिवाळीत अक्षरा आणि अधिपतीमधे प्रेमाचं नातं खुलताना दिसणार आहे. ( Tula Shikvin Changlach Dhada )

संबंधित बातम्या 

येत्या आठवड्यात प्रेक्षकांना अक्षरा आणि भुवनेश्वरीमध्ये शाळेत जाण्यावरून मतभेद होणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. बायको की आई? या परिस्थितीमुळे अधिपतीला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ही तारेवरची कसरत अधिपती कशी निभावून नेणार? हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. यामुळे 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचा पुढिल भाग पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ( Tula Shikvin Changlach Dhada )

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news