Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेने सांगितली टीव्हीतील तिच्या अभिनयाची खास कहाणी | पुढारी

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेने सांगितली टीव्हीतील तिच्या अभिनयाची खास कहाणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंकिता लोखंडेने तरुण वयात मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले आणि लोकप्रिय टीव्ही मालिका “पवित्र रिश्ता” मधील अर्चनाच्या भूमिकेने अनेकांची मने जिंकली. तिने तिचा पती विकी जैन सोबत बिग बॉस 17 (Bigg Boss 17) च्या घरात एका नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. या पॉवर कपल त्यांच्या अस्सल स्वभावात पाहायला मिळत आहे. (Bigg Boss 17)

अंकिताने अलीकडेच लोकप्रिय रिअॅलिटी शोमधील दुसर्‍या स्पर्धकासोबत तिच्या आजपर्यंतच्या अभिनय कारकीर्दीबद्दल चर्चा केली आणि तिने हे देखील नमूद केले की तिचे पालक तिच्या आजपर्यंतच्या निर्णयांमध्ये तिच्या आयुष्यभर तिच्या सोबत आहेत. अंकिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्याला कॅप्शन दिल आहे. “तिने हे सर्व केले आहे, परंतु ते कधीही सोपे नव्हते.”

अंकिताचा हा प्रवास तिच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि आव्हानांचा आहे. अंकिता नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री ठरली असून आता बिग बॉसच्या घरात ती काय खेळी करणार हे पाहेणे उत्सुकतेच असणार आहे.

Back to top button