MAMI : अपारशक्ती खुराणाची “बर्लिन”मधील भूमिका ठरली अव्वल | पुढारी

MAMI : अपारशक्ती खुराणाची "बर्लिन"मधील भूमिका ठरली अव्वल

पुढारी ऑनलाईन डेस्क : बहुआयामी अभिनेता अपारशक्ती खुराना यांचा नवीन चित्रपट “बर्लिन”चा नुकताच MAMI मधे प्रिमियर पार पडला. अभिनेत्याच्या मनमोहक कामगिरीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. अपारशक्ती खुराणा यांनी ‘बर्लिन’ चित्रपटात साकारलेल्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांना एका अविस्मरणीय प्रवासात नेले. (MAMI)

टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये प्रीमियर झाल्यानंतर हा चित्रपट लॉस एंजेलिस 2023 च्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आला.

“बर्लिन”मधील त्याच्या अभिनयाने त्याच्या पात्रांना जीवंत केलं. “ज्युबिली” या वेब सिरीजचे लेखक अतुल सबरवाल यांनी “बर्लिन”चे दिग्दर्शन केले आहे. इश्वाक सिंग, राहुल बोस आणि कबीर बेदीदेखील भूमिकेत आहेत. अपारशक्ती अॅप्लाज एंटरटेनमेंटच्या सहकार्याने “फाइडिंग राम” या माहितीपटाद्वारे चाहत्यांना अनोखी पर्वणी देणार आहे.

Back to top button