Sonu Sood : ‘फतेह’ चं शूटिंग संपताच सोनूची भावूक पोस्ट; जॅकलिनचे अनसीन फोटो व्हायरल | पुढारी

Sonu Sood : 'फतेह' चं शूटिंग संपताच सोनूची भावूक पोस्ट; जॅकलिनचे अनसीन फोटो व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सोनू सूदने ( Sonu Sood ) त्याच्या डेब्यू प्रोडक्शन ‘फतेह’ साठी चित्रीकरण पूर्ण केल्याने चाहत्यांसाठी आगामी प्रोजेक्टच्या पडद्यामागील एक खास झलक शेअर केली आहे. सोनूने त्याची सह-अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्यासोबत पडद्यामागील फोटो शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली. या निमित्ताने या कलाकारांमधील निर्विवाद केमिस्ट्री पाहायला मिळाली. या दोघांची ऑन-स्क्रीन जादू मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आता सगळेच उत्सुक आहेत.

संबंधित बातम्या 

सोनूचा ( Sonu Sood ) आगामी “फतेह” हा चित्रपट अ‍ॅक्शन सीनने भरलेला आहे. अलीकडेच सोनूने काही खास फोटो शेयर केले असून पडद्यामागील फोटोंची सोनूने खास झलक दाखवली आहे. सोनू सूद आणि बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांच्या आकर्षक ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीची एक आकर्षक झलक पाहायला मिळाली आहे. यामुळे हॉलिवूड-शैलीचा थरार अनुभवण्यासाठी आता चाहते उत्सुक झाले आहेत. झी स्टुडिओज, शक्ती सागर प्रॉडक्शनच्या सहकार्याने “फतेह” या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

सोनूने सोशल मीडियावरील या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “फतेह ही एक जादुई प्रवासाची फक्त सुरुवात आहे, आणि मी या चित्रपटाचं शूट पूर्ण केल आहे. जॅकी मी तुझ्या नम्रतेची परिश्रमाची आणि समर्पणाची मनापासून प्रशंसा करतो.@jacquelienefernandez ” सोनू आणि जॅकलिनच्या या चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

Back to top button