Tiger-Disha Patani : ब्रेकअपनंतर पुन्हा एकत्र येणार टायगर-दिशा | पुढारी

Tiger-Disha Patani : ब्रेकअपनंतर पुन्हा एकत्र येणार टायगर-दिशा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री टायगर श्रॉफ सध्या ‘गणपत’ चित्रपटामुळे चर्चेत होता. या चित्रपटात टायगर सोबत कृती सेनॉनदेखील होती. आता टायगर श्रॉफच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. ब्रेकअपनंतर टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीची सिजलिंग जोडी पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर धुमाकूळ घालायला तयार आहे. (Tiger-Disha Patani) रिपोर्टनुसार, ब्रेकअपनंतर आता निर्माते जगन शक्ती यांचा ॲक्शन चित्रपट हिरो नंबर १ मध्ये दोघे दिसणार आहेत. (Tiger-Disha Patani)

संबंधित बातम्या-

‘बागी २’ मध्ये पहिल्यांदा एकत्र

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीची जोडीला एकत्र चित्रपटात पाहण्यासाठी फॅन्स खूप उत्सुक आहेत. दोघेही पहिल्यांदा २०१८ मध्ये रिलीज झालेला चित्रपट ‘बागी २’ मध्ये स्क्रीन शेअर केली होती. दोन्ही सेलेब्सचे फॅन फॉलोइंग चांगले आहे.  आता ‘हिरो नंबर १’मध्ये दोघेही पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.

टायगर श्रॉफ ‘गणपत’ या अॅक्शन ड्रामा चित्रपटाच्या पहिल्या भागात दिसणार आहे. त्याचसोबत तो लवकरच ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये दिसणार आहे. तर दिशा पटानी ‘कल्की 2898 एडी’, ‘योद्धा’ आणि दाक्षिणात्य चित्रपट ‘कंगुवा’मध्ये दिसणार आहे.

Back to top button