HBD Aditi Rao Hydari : राजघराणं…पहिलं लग्न लपवून ठेवलं..अशी आहे अदितीची कहाणी | पुढारी

HBD Aditi Rao Hydari : राजघराणं...पहिलं लग्न लपवून ठेवलं..अशी आहे अदितीची कहाणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांना मोहित करणारी अदिती राव हैदरीचा आज २८ ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. अदिती राव हैदरी एक अभिनेत्री म्हणून तिच्या अष्टपैलु व्यक्तिमत्वाने नेहमीच चर्चेत असते. (HBD Aditi Rao Hydari) विविध भूमिका करून कायम प्रेक्षकांच्या मनात घर करुन जाते.विविध प्रकल्पांसह रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी ती सज्ज आहे. ऐतिहासिक नाटकांपासून ते विचार करायला लावणाऱ्या कथांपर्यंत, आदितीचे आगामी प्रकल्प सिनेप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहेत. (HBD Aditi Rao Hydari)

संबंधित बातम्या – 

तुम्हाला माहिती आहे का, हैदराबादमधील एका शाही परिवारामध्ये अदिती राव हैदरीचा जन्म झाला. आज ती तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. अदितीचा जन्म २८ आक्टोबर १९८६ रोजी हैदराबादमधील तेलंगानामध्ये झाला होता. अदितीचे पणजोबा अकबर हैदरी १८६९ ते १९४१ पर्यंत हैदराबादचे पंतप्रधान होते. तिचे काका मोहम्मद सालेह अकबर हैदरी आसामचे माजी राज्यपाल होते. अदितीच्या वडिलांचे नाव एहसान हैदरी आहे आणि आईचे नाव विद्या राव. अदितीची आई त्यावेळी ठुमरी आणि दादराच्या प्रसिद्ध गायिका होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari)

छोट्या वयात केलं लग्न

अदितीने वयाच्या २१ व्या वर्षी लग्न केलं होतं. वयाच्या १७ व्या ‍वर्षी तिची भेट सत्यदीप मिश्राशी झाली होती. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर लग्नगाठ बांधळी.पण, अदितीने आपले लग्न अनेक वर्षे लपवून ठेवले. २०१३ मध्ये त्यांच्या लग्नाचा खुलासा झाला होता. पुढे त्यांचा घटस्फोटही झाला.

हीरामंडी – हीरामंडी हे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत अदितीचा दुसरा चित्रपट आहे. या बहुप्रतीक्षित प्रकल्पामुळे भारतीय मनोरंजन जगतात खळबळ उडाली आहे. आगामी मालिका ऐतिहासिक रेड-लाईट डिस्ट्रिक्टमध्ये अदिती एक समृद्ध आणि सशक्त कथानक साकारताना दिसते. वर्षाच्या अखेरीस नेटफ्लिक्सवर प्रीमियर होणार्‍या या मालिकेत आदिती राव हैदरीला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

गांधी टॉक्स – “गांधी टॉक्स” मधील अदिती राव हैदरी आणि विजय सेतुपती यांचे सहकार्य खूप उत्साहवर्धक आहे. “सुफियुम सुजातायुम” मधील मूक मुलीच्या भूमिकेसाठी ओळखली जाणारी अदिती एका अनोख्या सिनेमॅटिक प्रवासाला सुरुवात करणार आहे. तिच्या अभिनयाच्या पराक्रमाने आणि विजय सेतुपतीच्या उत्कृष्ट उपस्थितीने, “गांधी टॉक्स” विचार करायला लावणारा चित्रपट आहे. उल्लेखनीय म्हणजे, हा चित्रपट संवादविरहित असून, केवळ प्रसिद्ध संगीतकार ए. आर. यांच्या संगीतावर अवलंबून आहे

लायनेस : अदिती राव हैदरीचा आगामी हॉलिवूडपट आहे. “लायनेस” हा तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. अभिनेत्री अदिती लायनेस एक आकर्षक आणि प्रभावशाली कथा सादर करण्यासाठी तयार आहे.

Back to top button