Aangan Apno Ka : आंगन – अपनों कामध्ये महेश ठाकूर प्रेमळ वडिलांच्या भूमिकेत

mahesh thakur
mahesh thakur
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी सबवरील आंगन – अपनों का या आगामी मालिकेत एका अशा मुलीची गोष्ट आहे, (Aangan Apno Ka) जी आपल्या वडिलांची जबाबदारी शेवटपर्यंत सांभाळण्यास तत्पर आहे. ही आधुनिक काळातील कौटुंबिक मालिका आहे, ज्यात लग्नाविषयीचा अगदी वेगळा दृष्टिकोन असलेल्या एका मुलीची हृदयस्पर्शी गोष्ट आहे. (Aangan Apno Ka)

संबंधित बातम्या –

या मालिकेत ज्येष्ठ अभिनेता महेश ठाकूर जयदेव शर्मा ही भूमिका साकारत आहे, जो एक प्रेमळ पिता आहे. आपल्या पत्नीच्या अकाली मृत्यूनंतर त्याने एकट्याने आपल्या तीन मुलींचा सांभाळ केला आहे. जीवनाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. एक पिता आणि त्याची मुलगी पल्लवी (आयुषी खुराना) यांच्यातील सुंदर नात्यावर प्रकाश टाकणारी आंगन ही मालिका प्रेम आणि जबाबदारी यांची गोष्ट आहे. शिवाय त्यात पल्लवीचा लग्नाबाबतचा दृष्टिकोन अगदी वेगळा आहे.

जयदेव शर्माची भूमिका करत असलेला महेश ठाकूर म्हणतो, "एक कलाकार म्हणून सोनी सबया वाहिनीसोबत काम करताना मला खूप आनंद होत आहे, कारण या वाहिनीवर पुरोगामी विषय असलेला उत्तम कंटेंट सादर होत असतो. 'आंगन – अपनों का' मालिकेची पटकथा पहिल्यांदा वाचली, तेव्हाच मला जयदेव हे व्यक्तिमत्व खूप आवडले होते. त्याचा नौदलातील सेवेचा काळ, पत्नीच्या अकाली मृत्यूचा आघात, तिन्ही मुलींचे त्याने एकट्याने केलेले संगोपन यामधून एका सिंगल पेरेंटची अदम्य ताकद दिसते. आपल्या मुलींशी असलेले त्याचे नाते त्याच्यासाठी सर्वस्व आहे. जयदेव आणि त्याच्या मुलींमधले हे नाते कधी प्रेक्षकांपुढे उलगडते याची उत्सुकता मला आहे."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news