‘व्यभिचाराचं समर्थन नको’ : रणवीरसोबत असताना इतर पुरुषांना डेटवर बोलून दीपिका ट्रोल; नेटिझन्सनी घेतले फैलावर

‘व्यभिचाराचं समर्थन नको’ : रणवीरसोबत असताना इतर पुरुषांना डेटवर बोलून दीपिका ट्रोल; नेटिझन्सनी घेतले फैलावर

पुढारी ऑनलाईन डेस्क : दीपिका पदुकोन आजची बॉलिवूडची सुपरस्टार आहे. बाजीराव मस्तानी, जवान, पठाण असे यशस्वी चित्रपट तिच्या नावावर आहेत. जबरदस्त फॅन फॉलोविंग असल्याने दीपिकाला सहसा ट्रोलिंगचा सामना करावा लागत नाही. पण रणवीरसोबत असताना परपुरुषांशी डेटिंगबद्दल बोलून दीपिका चांगलीच अडचणीत आली आहे. (Deepika Padukone | Ranveer | Koffee with karan)

कॉफी विथ करण या करण जोहरच्या शोमध्ये दीपिका आणि रणवीर सहभागी झाले होते. नवरा-बायकोंनी एकत्र मुलाखत देण्याचा तसा दुर्मिळ क्षण होता. यात करणने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना दीपिका म्हणाली, "रणवीरला डेट करत असताना, मी इतर पुरुषांनाही भेटत होते, त्यात मला मजाही वाटत होती, पण माझ्या बॅक ऑफ माईंडमध्ये मात्र मी रणवीरशी कमिटेड होते." रणवीरने प्रपोज करण्यापूर्वी मी काही खराब रिलेशनशिपमधून गेले होते, आणि मला कमिटेड रिलेशनशिप नको होती, असेही ती म्हणाली. दीपिका हे बोलत असताना रणवीरच्या चेहऱ्याचे रंग उडाल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसून येते, आणि नेटिझन्सने यावर मिम्स बनवून व्हायरल केले आहेत. (Deepika Padukone | Ranveer | Koffee with karan)

या विधानावरून दीपिकाला प्रचंड ट्रोल केले जात आहे. इतकेच नाही तर रणबीरसोबतच्या ब्रेकअपलाही आता नेटिझन्स तिलाच जबाबदार धरू लागले आहेत.

अरनाझ हाथिराम म्हणतात, "तुला मजा करायची होती इथंपर्यंत ठीक आहे. पण याला महिला सबलीकरणाचे लेबल लावू नका, तसेच व्यभाचाराला मान्यता देण्याचे प्रकार थांबवा."

तर सिया या युजरने म्हटले आहे, "आता दीपिका सगळ्यांत वाईट महिला म्हणून पुढे आलेली आहे. जेव्हा रणबीरसोबत ब्रेकअप झाला, तेव्हा सर्वांनी रणबीरला जबाबदार धरले होते, त्या वेळी ती काय करत होती, कुणालाच माहिती नाही."

तर एका युजरने म्हटले आहे की दीपिका फक्त रणवीरचा वापर करून घेत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news