Adishakti Muktai : आदिशक्ती ‘मुक्ताई’ रुपेरी पडद्यावर | पुढारी

Adishakti Muktai : आदिशक्ती ‘मुक्ताई’ रुपेरी पडद्यावर

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात ज्या स्त्री संत आपल्या कर्तृत्वाने अजरामर झाल्या, त्यात ‘संत मुक्ताई’ यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. (Adishakti Muktai) संत मुक्ताईच्या मुक्तपणाचे व श्रेष्ठपणाचे संतश्रेष्ठींनी ‘मुक्तपणे मुक्त, ‘श्रेष्ठपणे श्रेष्ठ’, सर्वत्रा वरिष्ठ आदिशक्ती मुक्ताई’।। असे वर्णन केले आहे. (Adishakti Muktai)

संत ज्ञानेश्वरांची लहान बहीण म्हणून संत मुक्ताबाई या सर्वाना परिचित आहेत. माऊलींप्रमाणेच त्यांचेही आयुर्मान तुलनेने तसे फारच कमी होते. मात्र, त्यांच्या हातून घडलेले कार्य हे सर्वार्थाने महान असेच ठरले. मुक्ताईचे छोटेसे जीवन अत्यंत तेजोमय, प्रखर ज्ञानचेतनेचे सिद्ध जीवन होते. छोट्या आयुष्यात या जगन्मायेने संत कवयित्रींच्या काव्यानुभवांचा पाया रचला. स्त्रियांना अध्यात्माचे क्षेत्र खुले करून देऊन त्यात स्त्री-कर्तृत्वाचा आदर्श उभा केला.

अशा ‘मुक्ताई’ च्या दृष्टीकोनातून संत ज्ञानेश्वरांच्या दिव्य कुटुंबाची भेट घडवणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘मुक्ताई’ हा भव्य चित्रपट येतोय.

‘शिवराज अष्टका’तील चित्रपटांना मिळत असलेल्या यशानंतर महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा अध्याय ‘मुक्ताई’ चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यासाठी दिग्पाल लांजेकर सज्ज झाले आहेत. ‘मुक्ताई’ चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial)

Back to top button