Kannada Bigg Boss : वाघाच्या नखांपासून बनवलेले पेंडेंट घालणे पडले महागात, संतोषना अटक | पुढारी

Kannada Bigg Boss : वाघाच्या नखांपासून बनवलेले पेंडेंट घालणे पडले महागात, संतोषना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस टीव्हीवरील रिॲलिटी शो विविध भाषांमधून रिलीज होते. कन्नड बिग बॉस शोदेखील चर्चेत आला आहे. या शोमध्ये असं काही घडलं की, त्याची चर्चा सगळीकडे होताना दिसली. बिग बॉस कन्नडविषयी एक मोठे वृत्त समोर आले आहे. (Kannada Bigg Boss) या शोमधील स्पर्धक वर्थुर संतोष यांना शोमधून अटक करण्यात आली आहे. गळ्यात भारीभरकम वाघाच्या नखापासून बनवलेले पेडेंट घालणे संतोष यांना महागात पडले आहे. (Kannada Bigg Boss)

संबंधित बातम्या-

मीडिया रिपोर्टनुसार, संतोष यांना वन विभाग पोलिसांनी अटक केलीय. वन विभागाने पोलिसांना बिग बॉसच्या घरात जाऊन संतोष यांनी चेन बाहेर आणण्यास सांगितले. तपासानंतर अशी माहिती समोर आली की, संतोष यांच्या गळ्यातील चेन वाघाच्या नखांपासून बनवलेली आहे.

यानंतर वनविभागाने संतोष यांना आमच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी बिग बॉसला केली. काही तासांनी संतोष घराबाहेर येताच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याविरोधात एफआयआरदेखील दाखल केल्याची माहिती समोर आलीय. अद्याप संतोष यांची चौकशी सुरु आहे.

Back to top button