टायगरचा ‘Ganapath’, ‘यारियां २’ची कासवगतीने कमाई; ‘लियो’नं मारली बाजी

Ganapath
Ganapath

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याचा 'गणपत' ( Ganapath ) हा चित्रपट २० ऑक्टोबरला म्हणजे, याच आठवड्यात रिलीज झाला. या चित्रपटात टायगरचे धमाकेदार ॲक्शन सीन पाहायला मिळाले. टायगरसोबत बॉलिवूड अभिनेता बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री क्रिती सेनॉनने भारदस्त अभिनय साकारलाय. चित्रपट रिलीज होवून नुकतेच दोन दिवस उलटले आहेत. दरम्यान, कथा आणि अभिनयामुळे हा चाहत्यांच्या मनावर जादू करू शकला नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कासवगतीने कमाई करत आहे. तर दुसरीकडे साऊथ स्टार्स विजयच्या 'लियो' ने पहिल्याच दिवशी बाजी मारली.

संबंधित बातम्या

मिळालेल्या माहितीनुसार, नुकतेच टायगर श्रॉफच्या 'गणपत' ( Ganapath ) चित्रपटाचे ओपनिंग डे म्हणजे, पहिल्या दिवसांच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ २.५० कोटी रूपयांची कमाई केली आहे. तर चित्रपटाच्या हिंदी भाषेत एकूण कमाई ९.७२% इतकी झाली. यामुळे टायगरचा हा आतापर्यंतचा सर्वात कमी ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. अजून येत्या काही दिवसात चित्रपटाच्या कमाईचे आकडे वाढतील असे आशा व्यक्त केली जात आहे.

याआधी टायगरच्या 'हिरोपंती २' या चित्रपटाने पहिल्या दिवशी ६.५० कोटी रूपयांची कमाई केली होती. तर 'बागी ३' ने पहिल्या दिवशी १७ कोटींची कमाई केली होती. तर टायगरचा आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनर 'वॉर' असून या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ५३.३५ कोटींची कमाई केली होती. २०१४ मधील 'हीरोपंती' चित्रपटाने पहिल्या दिवशी ६.६३ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात टायगरसोबत क्रिती सेनॉनने अभिनय साकारलाय. यावरून टायगरचा 'गणपत' खराब कामगिरी करत असल्याचे समजते. परंतु, अद्याप पुढील आकडेवारी माहित नसल्याने काहीही तर्क- वितर्क लावता येत नाहीत.

तर दिव्या खोसला कुमार, मीझान जाफरी आणि पर्ल व्ही. पुरी यांचा 'यारियां २'चीदेखील 'गणपत'च्या आंकड्यापेक्षा खराब कामगिरी पाहायला मिळाली.या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केवळ ६० लाखांची कमाई केली. एकिकडे 'गणपत' आणि 'यारियां २' या चित्रपटाची कासव गतीने वाटचाल सुरू असताना दुसरीकडे मात्र, साऊथ स्टार्स विजय यांचा 'लियो' चित्रपटाने बाजी मारली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी भरघोष अशी ७४ कोटी रूपयांची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ४२. ५० कोटींची कमाई केली आहे. यामुळे टायगरच्या 'गणपत'पेक्षा 'लियो' ची जादू चाहत्यांच्यात पसरली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news