Malaika Arora Troll : …साऊथ अभिनेत्रींकडून थोडं शिका; मलायका ट्रान्सपरंट ड्रेसनं ट्रोल

Malaika Arora Troll
Malaika Arora Troll

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या फॅशन सेन्स, योगा आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. वयाच्या ४९ व्या वर्षीदेखील ती फिट ॲन्ड फाईन दिसत असल्याने चाहते तिच्यावर फिदा आहेत. सध्या मलायका नुकतेच एका कार्यक्रमात ट्रान्सपरंट कपडे परिधान करून स्पॉट झाली आणि तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा ( Malaika Arora Troll ) सामना करावा लागला. दरम्यान मलायकाला अभिनेत्री उर्फी जावेदची कार्बन कॉफी म्हटलं गेलं आहे.

संबंधित बातम्या 

अभिनेत्री मलायकाने नुकतेच एका कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात ती ट्रान्सपरंट असणाऱ्या बोल्ड कपड्यांमध्ये दिसली. मलायकाने ॲक्वा ब्ल्यू शिमरी ड्रेसवर मोकळे केस आणि हाय हिल्स परिधान लूक पूर्ण केला होता. या कार्यक्रमाला पोहोचण्याआधी मलायकाने पापाराझींच्या कॅमेऱ्यासमोर हॉट पोझ दिल्या. यावेळचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.

मलायकाचा हा व्हिडिओ पाहून काही सोशल मीडिया युजर्सनी तिच्या लूकचे कौतुक केलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिला चांगलेच धारेवर धरत ट्रोलही केलं आहे. 'उर्फी जावेद तर उगाच बदनाम आहे','ही कोणत्या कंपनीची अशी डिझाइन आहे', 'बॉलिवुडमध्ये जास्त करून कधी साडी, सूट किंवा कोणत्याही सुंदर ड्रेसची कल्पना करू शकत नाही', 'अंगप्रदर्शन करण्यापेक्षा साऊथच्या अभिनेत्रींकडून काहीतरी शिका.', 'मम्मी जी १८ वर्षांच्या मुलींना स्पर्धा करत आहेत'. असे नेटकऱ्यांनी म्हटंल आहे. या व्हिडिओला आतापर्यत ३० लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. ( Malaika Arora Troll )

हेही वाचा : 

(video : viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news