Swapnil Joshi : 'वाळवी'नंतर ‘नाच गं घुमा’ येतोय; स्वप्नील जोशी निर्मिती क्षेत्रात | पुढारी

Swapnil Joshi : 'वाळवी'नंतर ‘नाच गं घुमा’ येतोय; स्वप्नील जोशी निर्मिती क्षेत्रात

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिलांच्या स्वभाव वैशिष्ट्य आणि गमती-जमतींवर आधारित, एका अगदी धमाल चित्रपटाची निर्मिती होत आहेत. मराठीतील आघाडीचे कलाकार अभिनेता स्वप्नील जोशीची ( Swapnil Joshi ) पहिलाच निर्मिती असलेला ‘नाच गं घुमा’ नावाचा हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी यांनी दिग्दर्शक केलं आहेत.

संबंधित बातम्या

‘नाच गं घुमा’ ही ज्येष्ठ लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेली कथा असून महिलांच्या अवतीभोवती घडणाऱ्या आणि त्यांच्याशी संबंधित अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी यात गुंफल्या गेल्या आहेत. महिलांच्या संबंधातील गोष्टी साकारताना स्त्रीत्त्वाचा एक वेगळा पैलू अलगद समोर येतो आणि तिच्या बुद्धी-भावनेच्या अचूक मिश्रणावर प्रकाश पडतो असे चित्रपटाचे कथानक आहे. ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाची घोषणा केली असून या निमित्ताने एक छोटेखानी टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट १ मे २०२४ रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. मधुगंधा कुलकर्णी यांनी ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी या चित्रपटाची संकल्पना सांगितल्यानंतर त्यांनी या चित्रपटास होकार दर्शविला.

स्वप्नील जोशी ( Swapnil Joshi ) यांनी या चित्रपटाच्या घोषणेच्या निमित्ताने फेसबुकवर लिहिले आहे की, ‘घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर जगातील सर्व सर्व स्त्रियांना त्रिवार वंदन करून घेवून येत आहोत….आमच्या नव्या चित्रपटाची घोषणा…‘नाच गं घुमा. भेटूया चित्रपटगृहात १ मे २०२४ ला !’.

मधुगंधा, परेश, स्वप्नील या मंडळींचा नुकताच आलेला ‘वाळवी’ चित्रपटाला खूपच लोकप्रियता मिळाली. हरीश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, चि व चि सौ कां, आत्मपॅम्प्लेट, वाळवी यांसारख्या दर्जेदार व गाजलेल्या चित्रपटांच्या निर्मिती नंतर ‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ या पुढील चित्रपटाची प्रस्तुती करत आहेत. या चित्रपटांशी संबंधीत सर्वजण एकत्र येत असल्याने ‘नाच गं घुमा’विषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ‘नाच गं घुमा’चे निर्माते परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत -देसाई, तेजस देसाई, तृप्ती पाटील यांनी केलं आहेत.

हेही वाचा : 

Back to top button