Tejaswini Pandit : कुणाकुणाचा आवाज दाबणार?; तेजस्विनीच्या ट्विटवर रोहित पवारांचे समर्थन

Tejaswini Pandit
Tejaswini Pandit
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने ( Tejaswini Pandit ) गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ शेअर करत टोलचे पैसे कुणाच्या खिशात जातात? असा प्रश्न उपस्थित केला होता. या पोस्टनंतर तेजस्विनीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. दरम्यान तेजस्विनीच्या एक्स ट्विटर अकाऊंटची ब्लू टिकदेखील हटविण्यात आली होती. यादरम्यान तिने सोशल मीडियावर 'कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही!..' म्हणत आणखी एक पोस्ट शेअर केली. आता या पोस्टला रिट्विट करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तिचे समर्थन केलं आहे.

संबधित बातम्या 

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केलेल्या पोस्ट पुन्हा रिट्विट करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तिचे समर्थन केलं आहे. यात त्यांनी लिहिलं आहे की,'विरोधात व्हिडिओ टाकला म्हणून ट्रोल गँग वापरून ट्रोल करायचं. ट्विटरची ब्लू टिक काढायची, हे अत्यंत खालच्या पातळीवरचं राजकारण आहे. अशाप्रकारे कुणाकुणाचा आवाज दाबणार?. इतका कपटीपणा योग्य नाही. प्रत्येकाला विचारधारेचं, आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि मुलभूत अधिकारही आहे, परंतु, सत्तेचा गैरवापर करून आपण हा मुलभूत अधिकारही हिरावून घेणार का? असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला.

तेजस्विनी पंडितचे ट्विटस्

तेजस्विनीने ( Tejaswini Pandit ) तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, 'कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही! माझ्या X (ट्विटर) अकाऊंटचं व्हेरिफिकेशन, काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं, कारण का तर मी एक 'आम्हा जनतेची' इतकी वर्ष फसवणूक झाली असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून?'.

'X (ट्विटर) अकाउंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तर तो योग्य कारणासाठी जाणं, हा त्याहून मोठा सन्मान मला दिलात त्याबद्दल धन्यवाद. पण या बंदीने माझा काय किंवा सामान्य माणसांच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही. सामान्यांचा आवाज बंद करणे हाच यांचा बहुदा एकमात्र 'X' फॅक्टर आहे हे मात्र स्पष्ट होत जाईल. असो, माझा 'जय हिंद जय महाराष्ट्र' साठीचा घोष योग्य वेळी सुरूच राहील. सत्तेत कोणीका बसेना, आम्ही जनता आहोत! जेव्हा जेव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल, तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदुमणारच आहे!!!. जय हिंद जय महाराष्ट्र!". असेही तिने पोस्टमध्ये लिहिले आहे. ही पोस्टदेखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news