शाहरुख खानच्या Jawan ने घडवला इतिहास, वर्ल्डवाईड कलेक्शन ११०० कोटी पार | पुढारी

शाहरुख खानच्या Jawan ने घडवला इतिहास, वर्ल्डवाईड कलेक्शन ११०० कोटी पार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जवानने ११००० कोटी रुपयांचे वर्ल्डवाईड कलेक्शन करत इतिहास घडलवला आहे. अद्यापही शाहरुख खानची क्रेझ कमी झालेली नाही. विक्रम राठोड आणि त्यांचा मुलगा आझाद यांची कथा जवानमध्ये दाखवण्यात आली. या कथने जगभरातील प्रेक्षकांना भूरळ पाडली. या चित्रपटाची कमाई अजूनही सुरूच आहे.

१००० कोटींची कमाई केल्यानंतर शाहरुखचे चाहत्यांकडून जगभरात अभिनंदन झाले. आता चित्रपटाने अकराशे कोटींचा टप्पा गाठला आहे. जवानने ११०० कोटी पार केल्यानंतरही शाहरुखच्या जवानचे कलेक्शन सुरुच आहे.

जवानचे आतापर्यंतचे कलेक्शन ग्लोबल बॉक्स ऑफिसवर ११०३.२७ कोटी झाले आहे. आता भारतीय सिनेमाच्या इतिहासात ११०० कोटींचा आकडा पार करणारा पहिला हिंदी चित्रपट बनवला आहे. चित्रपटाने भारतात ७३३.३७ कोटींचे कलेक्शन केलं आहे. ओव्हरसीजमध्ये ३६९.९० कोटींची कमाई केली. हिंदी भाषेतील कलेक्शन ५६०.३ कोटी झालं आहे. चित्रपट ६०० कोटीमध्ये एन्ट्री करण्यासाठी तयार आहे. तमिळ आणि तेलुगु भाषेत ५९.८९ कोटींचा बिझनेस केला आहे. एकूण मिळून चित्रपटाने सर्व भाषेत मिळून ६१९.९२ कोटींचे कलेक्शन केलं आहे.

Back to top button