Dhruv Tara : ताराचे महावीरसोबतचे संबंध कायमचे तुटणार? | पुढारी

Dhruv Tara : ताराचे महावीरसोबतचे संबंध कायमचे तुटणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी सबवरील ध्रुव तारा – समय सदी से परे (Dhruv Tara ) मालिकेचे वेधक कथानक आणि त्यात रोमान्स आणि टाइम ट्रॅव्हलची केलेली गुंफण व धक्कादायक ट्विस्ट आणि टर्न यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. इशान धवन आणि रिया शर्मा यांनी या मालिकेत अनुक्रमे नायक आणि तारा यांच्या भूमिका उत्तम साकारल्या आहेत, ज्यामुळे ही मालिका लोकप्रिय ठरली आहे. अलीकडेच प्रेक्षकांनी पाहिले की, महावीरला (कृष्ण भारद्वाज) नायकच्या ओळखीबद्दल शंका येते आणि त्याचे खरे उद्देश शोधून काढण्याच्या दिशेने तो पावले उचलू लागतो. (Dhruv Tara )

आगामी भागांमध्ये एकीकडे, महावीर नायकचे सत्य उघडकीस आणण्याच्या अगदी जवळ पोहोचेल, तर त्याच वेळी, ताराला हे समजते की, अलीकडे घडलेल्या सगळ्या रहस्यमय घाडामोडींच्या मागे डोके तिलोत्तमाचे(नेहा हरसोरा) आहे. तीच विश्वासघातकी आहे आणि सगळ्यांना नाचवते आहे. ही धक्कादायक गोष्ट तारा महावीरला सांगणारच असते, पण त्याचा आपल्या पत्नीवरचा अढळ विश्वास आड येतो व त्यामुळे त्याच्या आणि ताराच्या नात्यात वितुष्ट येते. महावीर नायकचे सत्य जाणून घेण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे आणि त्यात ताराने तिलोत्तमावर केलेले आरोप परिस्थिती आणखी गुंतागुंतीची करणार आहे.

प्रेक्षकांना आगामी भागांमध्ये काही नागमोडी वळणांतून प्रवास करताना भावनांचे चढ-उतार अनुभवास येणार आहेत आणि ही वळणे तारा आणि महावीर यांच्या नात्यात कायमी स्वरूपी बदल घडवून आणू शकतील.

महावीरला पटवून देण्यात तारा यशस्वी होणार का? 

महावीरला पटवून देण्यात तारा यशस्वी होणार का? की, तिच्या खुलाशामुळे त्या दोघांचे संबंध कायमचे तुटणार?

ताराची भूमिका करणारी रिया शर्मा म्हणते, “तारासाठी आपल्या वडिलांच्या मृत्यूचे रहस्य उलगडणे हा एक अथक शोध आहे. शिवाय, महावीर या आपल्या प्रिय व्यक्तीपासून तिने नायकबद्दलचे मोठे गुपित लपवून ठेवले आहे. मला वाटते की, ध्रुव हा खरा गुन्हेगार नसून उलट त्याची पत्नी तिलोत्तमा दोषी आहे- हे महावीरला पटवून देणे हे तारासाठी एक मोठे आव्हान असेल. ही गोष्ट उलगडताना बघायला प्रेक्षकांना नक्की खूप मजा येईल.”

महावीरची भूमिका करत असलेला कृष्ण भारद्वाज म्हणतो, “मी साकारत असलेला महावीर आपल्या पत्नीवर- तिलोत्तमावर आंधळेपणाने विश्वास ठेवतो आणि तिच्याविषयी शंका घेणाऱ्याची तो पत्रास ठेवत नाही. आता ताराने तिलोत्तमावर आरोप केला आहे. शिवाय नायकबद्दलचे मोठे गुपित महावीरपासून लपवून ठेवले आहे, त्यामुळे महावीरचा तारावरील विश्वास डळमळीत झाला आहे. कधी काळी ज्या बहीण-भावात आदर्श नाते होते, ते आता पार बदलून जाणार आहे आणि त्यात वितुष्ट येणार आहे. या तीव्र भावना माझ्या अभिनयातून दाखवणे हा माझ्यासाठी रोमांचक अनुभव असेल.”

Back to top button