क्लब 52 : खेळातला माणूस बदलला की खेळाची पद्धतही बदलते, हार्दिकचा न्यू लूक | पुढारी

क्लब 52 : खेळातला माणूस बदलला की खेळाची पद्धतही बदलते, हार्दिकचा न्यू लूक

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता हार्दिक जोशीला यंदा त्याच्या वाढदिवसाची अनोखी भेट मिळाली आहे. हार्दिकची प्रमुख भूमिका असलेल्या “क्लब 52 या चित्रपटाचं टायटल पोस्टर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लाँच करण्यात आले होते . आज हार्दिकच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन त्याच्या आगामी “क्लब 52” या चित्रपटातील लुक हा सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या-

नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत “क्लब 52 या चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. एक डाव नियतीचा अशी टॅगलाईन असलेल्या क्लब 52 या चित्रपटाच्या पोस्टरवर रावडी-रफटफ हार्दिक दिसून येतो. मोठ्या सोफ्यासारख्या खुर्चीत बसलेला हार्दिक, डोक्यातून वाहणारं रक्त आणि आजुबाजूला उडणारे पत्ते यातून कथानकाविषयीचे सूचक संकेत देण्यात आले आहेत. हार्दिकचा धमाकेदार लुक असलेल्या या पोस्टरमुळे चित्रपटाविषयी नक्कीच उत्सुकता वाढली आहे. प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच झाल्यानं हार्दिकला वाढदिवसाची अनोखी भेट मिळाली आहे.

येत्या १५ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात “क्लब 52” हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nathproduction (@nathproduction)

Back to top button