पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता ते नेता झालेले जनसेना पार्टी (JanaSena Party) चे अध्यक्ष पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत हातमिळवणी केली होती. पवन कल्याण यांच्या या निर्णयानंतर असा कयास लावला जात होता की, पवन कल्याण एनडीएतून बाहेर पडू शकतात. पवन कल्याण यांनी यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी एनडीएतून बाहेर पडल्याचे वृत्त नाकारले. काल पवन कल्याण यांनी एनडीए सोडल्याचे वृत्त व्हायरल झाले होते. पण, या वृत्तांना आता पूर्णविराम मिळाल. ते म्हणाले की, गरज पडल्यास ते बाहेर पडण्यापूर्वी कोणत्याही निर्णयाची घोषणा करतील.
संबंधित बातम्या –
वाराही यात्रेच्या माध्यमातून पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला. पवन कल्याणने आंध्र प्रदेशातीचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावरही निशाणा साधला.
पवन कल्याण कृष्णा जिल्ह्यातील मुदिनेपल्ली मंडळमध्ये आयोजित वाराही यात्रा 'Varahi Yatra' मध्ये सहभागी झाले. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले होते. ते म्हणाले, "मी (जनसेना पार्टी) एनडीएतून बाहेर जाण्यापूर्वी तुम्ही या (जगन मोहन रेड्डी) गोष्टीची चिंता करावी की, तुम्ही कशाप्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीत १७५ जागा मिळवू शकता.
पवन कल्याण म्हणाले, "आंध्र प्रदेशच्या सुशासन आणि विकासासाठी टीडीपीची गरज आहे." टीडीपी हा एक मजबूत पक्ष आहे आणि आंध्र प्रदेशला सुशासनासाठी राज्याच्या विकासासाठी तेलुगु देसम पक्षाची गरज आहे. आम्ही टीडीपीला पाठिंबा देऊ.
ते पुढे म्हणाले, "मी एनडीएमध्ये असलो तरी, टीडीपी सध्या कमकुवत असल्याने आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असे मी सांगत आहे. मी लोकांना हे स्पष्ट करू इच्छितो की आम्ही पूर्णपणे एनडीएसोबत आहोत आणि आम्ही टीडीपीसोबतही राहणार आहोत.