Sur Nava Dhyas Nava : ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ या तारखेपासून भेटीला

Sur Nava Dhyas Nava
Sur Nava Dhyas Nava

पुढारी ऑनलाईन डेस्क : कलर्स मराठीने प्रेक्षकांच्या भेटीस असा एक संगीतमय कार्यक्रम आणला ज्याने तमाम रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. प्रेक्षकांचा आवडता चैतन्यपूर्ण गाण्यांचा सांगीतिक कार्यक्रम "सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा" सुरू होत आहे कलर्स मराठीवर. (Sur Nava Dhyas Nava) कार्यक्रमाचा रंगमंच सूर आणि तालाने पुन्हा बहरणार पण यावेळेस जरा वेगळे घडणार. आपण म्हणतो ना जुनं ते सोनं असतं, पण… नवंही हवं असतं. आजवर या मंचावर आपण सगळ्यांनी अनेक सुप्रिसद्ध गाणी ऐकली त्यांचा आनंद घेतला. पण आता मात्र या गाण्यांना आजची तरुण पिढी एका नव्या ढंगात, नव्या रुपात सादर करणार आहेत आणि हे शिवधनुष्य या कार्यक्रमातील स्पर्धकांनी उचलले आहे. रंगमंचावर सप्तसुरांची उधळण होणार, नवनवे आविष्कार प्रत्येक आठवड्यात सादर होणार. मंच सज्ज आहे तुम्ही देखील सज्ज व्हा या सुरेल मैफिलीसाठी. (Sur Nava Dhyas Nava)

संबंधित बातम्या-

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री रसिका सुनील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेले महेश काळे तसेच हरहुन्नरी अदाकार अवधूत गुप्ते कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहेत. उत्तमातून उत्तर सूर शोधण्याचा हा ध्यास सुरू होत आहे ७ ऑक्टोबरपासून शनि – रवि रात्री ९. ०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

कार्यक्रमाच्या ऑडिशनला महाराष्ट्रभरातून निवडलेल्या १२ सूरवीरांमध्ये रंगणार आहे सामना. कोण ठरणार महविजेता ? कोणाला मिळणार मानाची कट्यार हे कळेलच.

या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन आपल्या सगळ्यांची लाडकी रसिका सुनील करणार आहे, यानिमित्ताने बोलताना ती म्हणाली, "मी खूपच उत्सुक आहे की, यावर्षी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे. कारण, माझ्यासोबतच आमच्या घरातील सगळे हा कार्यक्रम आवर्जून बघतो. सूर नवा ध्यास नवा वेगळ्या ढंगात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे त्यामुळे सूत्रसंचालन करण्यासाठी एक वेगळीच उत्सुकता आहे. यासाठी काही विशेष तयारी केली नाहीये, मी जशी आहे तशीच तुम्हां सगळ्यांसमोर येणार आहे. तेव्हा मला खात्री आहे तुमचं प्रेम मला पाहिल्यासारखंच मिळेल".

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news