Nehha Pendse : मे आय कम इन मॅडम? ची चर्चा संजना बनून नेहा पेंडसेने घातला धुमाकूळ

नेहा पेंडसे
नेहा पेंडसे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री नेहा पेंडसेचा मे आय कम इन मॅडम? (Nehha Pendse) ही मालिका इतकी लोकप्रिय ठरली की, त्याची अद्यापही चर्चा होताना दिसतेय. आता नेहा पेंडसे प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा आलीय. 'मे आय कम इन मॅडम? चा नवीन एपिसोड रिलीज झालाय. हा शो परत येण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे आणि यावेळीही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची आम्हाला आशा आहे, असे नेहा पेंडसेने आपल्या मालिकेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. (Nehha Pendse)

दिवाना साजन (अभिनेता संदीप आनंद) आणि ऑफिसची मालकिण संजना (अभिनेत्री नेहा पेंडसे) यांनी तुफानी धमाला आणि विनोदी खळखळाटाने मालिका गाजतेय. या मालिकेचा पहिला सीझनही तितकाच दमदार आणि शानदार होता. आता याच मालिकेच्या नव्या सीझनमधून नेहा पेंडसेने पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. तब्बल पाच वर्षांनंतर ती या मालिकेत पुन्हा संजनाच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

एडिट II प्रॉडक्शन निर्मित, 'मे आय कम इन मॅडम?' चा नवीन सीझन २६ सप्टेंबर रोजी स्टार भारतवर सोमवार-शनिवारी रात्री ९:३० वाजता प्रसारित होत आहे. याआधी निर्मात्यांनी मालिकेचा प्रीमियर रिलीज केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

या मालिकेतून साजन (संदीप आनंदने साकारलेला पात्र), संजना (नेहा पेंडसेने साकारलेले पात्र) आणि त्यांच्या ऑफिसमधल्या अनेक विनोदी किसे पुन्हा जीवंत करतील. विनोदी आणि हास्याने भरलेल्या या सीझनचे नवीन भाग प्रेक्षकांना नक्कीच हसवतील. ही कथा साजनच्या विनोदी पेचांवर प्रकाश टाकते.

नेहा पेंडसेने सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर लोकप्रिय अभिनेत्री बनण्यात मजल मारली. भाभीजी घर पे है मालिकेत तिने अनिता भाभीची भूमिका साकारली होती. या मालिकेत नेहाने अभिनेत्री सौम्या टंडनला रिप्लेस केले होते. या आधी ती बिग बॉस १२ मध्येही दिसली होती. केवळ २९ दिवस बिग बॉसच्या घरात तिला राहता आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by STAR Bharat (@starbharat)

 

View this post on Instagram

 

A post shared by STAR Bharat (@starbharat)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news