Parineeti-Raghav wedding: परिणीती-राघव वेडिंगच्या भव्य ‘महाराजा सूट’चे भाडे ऐकाल तर, थक्क व्हाल!

Parineeti-Raghav wedding
Parineeti-Raghav wedding

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्डा आज ( दि. २४ सप्टेंबर) सात फेरे घेत आहेत. राजस्थानच्या उदयपूर येथील भव्य 'लीला पॅलेस' मध्ये हा विवाह सोहळा पार पडत आहे.  दोन्ही कुटूंबांकडून या शाही विवाहाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. परिणीती आणि राघव या दोघांसाठी लीला पॅलेसमधील 'महाराजा सूट' (MaharajaSuite) बुक करण्यात आला आहे. राजस्थानातील  पॅलेसमधील महाराजा सूटचे एका दिवसाचे (प्रतिदिवस) भाडे हे तब्बल  १० लाख रुपये इतके आहे. (Parineeti-Raghav wedding)

संबंधित बातम्या:

गेल्या दोन दिवसांपासून उदयपूरमध्ये परिणीती-राघव यांच्या विवाहाची जय्यत तयारी सुरू आहे. अनेक बॉलीवूड स्टार्स आणि राजकीय मंडळी दिखामात हजेरी लावत आहेत. दरम्यान विवाहातील संगीत सेरेमनीच्या कार्यक्रम नुकताच पार पडला. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. या जय्यत तयारीत लीला पॅलेसमधील विवाहित जोडप्यासाठी असलेल्या 'महाराजा सूट'चे अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा अवाढव्य महाराजा सूट 3,500 स्क्वेअर फूट पसरलेला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या शेजारी नयनरम्य तलावाचे दृश्य आहे. याबव्य दिव्य 'महाराजा सूट' चे एका रात्रीचे भाडे १० लाख रूपये आहे. (Parineeti-Raghav wedding)

परिणीती आणि राघव आज रविवारी (दि. २४ संप्टेबर) रोजी पंजाबी पद्धतीने विवाह बंधनात अडकणार आहेत. या लग्नाचे विधी दुपारी २. ३० वाजल्यानंतर पार पडणार असून, यानंतर परिणीती- राघव दोघेजण सारफेरे घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. विवाहाला बॉलिवूडमधील अनेक स्टार्ससोबत राजकीय नेत्यांनी हजेरी लावली आहे; परंतु, परिणीतीची बहीण आणि बॉलिवूड-हॉलिवूड स्टार्स प्रियांका चोप्रा बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहते की नाही? याबद्दल अधिकृत माहिती देण्‍यात आलेली नाही. (Parineeti-Raghav wedding)

 

View this post on Instagram

 

A post shared by Zoom TV (@zoomtv)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news