Shriya Pilgaonkar : श्रियाने आग लगा दी! ऑरेंज वनपीसमध्ये क्यूट फोटोसेशन | पुढारी

Shriya Pilgaonkar : श्रियाने आग लगा दी! ऑरेंज वनपीसमध्ये क्यूट फोटोसेशन

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक चित्रपट आणि वेब सीरीजमधून अभिनयाची चुणूक दाखवणारी अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिने नवे फोटोसेशन केले आहे. ऑरेंज आऊटफिटमध्ये ती खूप क्यूट दिसते. (Shriya Pilgaonkar) एका खाटावर तिने केलेल्या फोटोशूटला फॅन्सकडून वाहव्वा मिळत आहे. श्रियाने जुन्या घराच्या बाहेर एका खाटावर हे मस्त फोटोशूट केले आहे. (Shriya Pilgaonkar)

सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी श्रियाने तिच्या अभिनयाच्या जोरावर सर्वांची मने जिंकली आहेत. मिर्झापूरमध्ये श्रियाने स्वीटी गुप्ता हे पात्र साकारले होते. श्रिया पिळगावकरने खूप कमी वयात अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

Shriya Pilgaonkar
Shriya Pilgaonkar

श्रिया पिळगावकरचा जन्म २५ एप्रिल १९८९ रोजी झाला. घराची पार्श्वभूमी अभिनयाचीच होती. तिने मराठी आणि हिंदी अशा दोन्ही अभिनय क्षेत्रात आपले कौशल्य सिद्ध केले आहे. श्रिया केवळ पाच वर्षांची असताना अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. सर्वात आधी तिने ‘तू तू मैं मैं’ या टीव्ही मालिकेमध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते.

Back to top button