नर्गिस फाखरीने शेअर केल्या गणपती उत्सवाच्या आठवणी

नर्गिस फाखरी
नर्गिस फाखरी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : घरोघरी बाप्पाच आगमन झालंय आणि सध्या सगळेच कलाकार या अनोख्या उत्सवात रमले आहेत. एकीकडे रॉकस्टार आणि मद्रास कॅफे सारख्या चित्रपटांमध्ये अप्रतिम अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या नर्गिस फाखरीने मुंबईच्या गणपती उत्सवाच्या भव्यतेबद्दल खास आठवण शेअर केली आहे. तिने एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं-"मुंबई आणि इथला गणेश उत्सव हा प्रेमळ असतो."

गणेश चतुर्थीच्या वेळी मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांचा भाग होण्यापासून ते गणपती उत्सवाचा एक भाग होण्यापर्यंत नर्गिस या बद्दल खास आठवणी लिहिते. तिने तिच्या पोस्टला कॅप्शन दिले: "मुंबईचे हृदय गणपतीच्या उत्सवाच्या तालात धडधडते, आणि मला नॉस्टॅल्जिक वाटत आहे. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा."

मुंबईच्या गणपती उत्सवाशी नर्गिसचं असलेलं नातं हे तिच्या पोस्टमधून समजते. जरी ती मैल दूर असली तरी तिचं प्रेम आणि उत्सवांच्या प्रेमळ आठवणी तिला आजही तिची खूप आवड असलेल्या शहराच्या हृदयाच्या जवळ आणत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nargis Fakhri (@nargisfakhri)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news