‘महिलांना प्रोत्साहन मिळेल’ : कंगना राणावत | पुढारी

‘महिलांना प्रोत्साहन मिळेल’ : कंगना राणावत

पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडले. आता त्याच्यावर सर्वपक्षीय चर्चा सुरू आहे, हे विधेयक सादर झाल्यानंतर अनेक स्तरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेत्री कंगना राणावत हिने या विधेयकावर आपले मत मांडले आहे.

ती म्हणाली, हा खूपच चांगला विचार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारमुळेच हे शक्य झाले आहे. यामुळे महिलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. यावेळी कंगनाने पंतप्रधान मोदी यांचे कौतुकही केले. कंगना ही स्पष्टोक्तीपणाबद्दल प्रसिद्ध आहे.

राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर ती बेधडकपणे मत मांडत असते. तिने अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. आता तिच्या राजकारणातील प्रवेशाबाबतही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सध्या तिचे संपूर्ण लक्ष चित्रपटांवर आहे. अभिनया सोबतच तिने दिग्दर्शनातही पाऊल ठेवले आहे.

हेही वाचा : 

Back to top button