jawan movie : छोटा पॅकेट मोठा धमाका!; नयनताराची मुलगी सीजा माहिती आहे का? | पुढारी

jawan movie : छोटा पॅकेट मोठा धमाका!; नयनताराची मुलगी सीजा माहिती आहे का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान आणि दीपिका पादुकोणचा ‘जवान’ ( jawan movie ) चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. तर दुसरीकडे चित्रपटातील कलाकार विक्रम राठोडपासून ते सर्वच कलाकारांच्या भरभरून कौतुक केलं जात आहे. चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री नयनतारा आणि दीपिका पादुकोण दोघीजणी एकमेंकाना टक्कर देत आहेत. दरम्यान चित्रपटात भूमिका साकराणाऱ्या एका छोट्याशा मुलगीची चर्चा जोर धरू लागली आहे. या चित्रपटात छोट्या मुलगीने नयनताराची मुलगीची भूमिका साकारली आहे. यामुळे जाणून घेवूयात ‘जवान’ चित्रपटातील ही छोटीशी मुलगी कोण आहे?.

संबधित बातम्या

‘जवान’ ( jawan movie ) चित्रपटात नयनताराच्या मुलगीची भूमिका सीजा सरोज मेहता हिने उत्तमरित्या साकारली आहे. सीजा फक्त ८ वर्षाची असून तिचा हा पहिलाच चित्रपट आहे. सीजा तिसरीत असून तिचा अभिनयाशी फारसा काही संबंध नाही. परंतु, तिने आपल्या दमदार अभिनय आणि निरागसतेने सर्वांची मने जिंकली आहेत.

सीजाच्या वडील एका आयटी कंपनीत कामाला आहेत. तर आई होममेकर आहे. तर सीजाची एक बहिण असून मी मात्र, अभिनय क्षेत्रात काम करते. साजीचे कुंटूबिय पुण्यात वास्तवास आहे. याआधी सीजाने एका मुलाखतीत ‘जवान’ चित्रपटातील कामाबद्दल आणि शाहरूख खानसोबत काम करण्याबद्दल माहिती सांगितली होती. कमी वयात बॉलिवूडच्या गाजलेल्या चित्रपटात काम केल्याने सीजाची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button